आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anand Education Socity Land Encroachment In Bhusawal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंद एज्युकेशनच्या भूखंडावर अतिक्रमण, स्वयंघोषित पदाधिकारी असल्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरातील नेब कॉलनीतील सव्र्हे क्रमांक 126/4 मधील जागा पालिका प्रशासनाने नियमित ठराव करून आनंद एज्युकेशन सोसायटीला शाळेसाठी दिलेली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सपकाळे यांनी या भूखंडावर अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. दरम्यान, आनंद एज्युकेशनचे अध्यक्ष दिनकर तुकाराम जावळे यांनी बेकायदेशीर बांधकाम त्वरित रोखण्यासाठी मुख्याधिकारी अनिल जगताप यांना निवेदन दिले आहे.

पालिका प्रशासनाने आनंद एज्युकेशन सोसायटीला सव्र्हे क्रमांक 126/4 मधील जागा शैक्षणिक कार्यासाठी दिली आहे. या संदर्भात 3 मे 1993 रोजी विशेष सभेत ठराव करण्यात आला होता. तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी या संदर्भात 7 मे 1994 रोजी सोसायटीच्या नावे पत्र देवून ठराव मंजूर होऊन शासनाने निर्धारित केलेल्या रकमेचे भाडे भरावे लागेल, असे स्पष्ट केले होते. यानंतर संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्तम कार्य या जागेपासूनच सुरू झाले. दरम्यान, आता या जागेच्या पूर्वेकडील रस्त्याच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सपकाळे यांनी ‘राजकीय वजन’ वापरून अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले आहे. नगररचना विभागाने शैक्षणिक कार्यासाठी आरक्षित केलेल्या या जागेचा ठराव करून संस्थेला दिली असतानाही ही जागा बळकावण्याचा प्रय} केला जातो आहे.

शहरात लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडून वाट्टेल तेथे अनधिकृत बांधकाम केले जात आहे. पालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने ‘आंधळं दळतयं अन् कुत्रा पीठ खातेय’ असा हा प्रकार आहे. आनंद एज्युकेशनच्या पत्रावर आता पालिका प्रशासन काय पाऊल उचलते? अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल काय? असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.

राजकीय द्वेषाने तक्रार
आनंद एज्युकेशन संस्थेच्या जागेवर अनेकांनी पक्के बांधकाम केले आहे. केवळ चार पत्रे टाकून या जागेचा वापर केला. राजकीय द्वेषाने ही तक्रार करण्यात आली. पक्षाची प्रतिमा मलिन होत असेल तर अतिक्रमण काढू. रवी सपकाळे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस मागासवर्गीय सेल

स्वयंघोषित पदाधिकारी
रवी सपकाळे यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसची जबाबदारी नाही. जे पद असेल ते स्वयंघोषित असावे. पदाचा दुरुपयोग करून कोणीही अनधिकृत बांधकाम करणार असेल, तर अशा व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. संजय सावकारे, आमदार, भुसावळ

बांधकाम काढणार
आनंद एज्युकेशन सोसायटीने केलेल्या तक्रारीनुसार रवी सपकाळे यांच्याविरुद्ध म्युनिसीपल अँक्टनुसार कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येईल. अनिल जगताप, मुख्याधिकारी, भुसावळ