आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • .... And Youth Girl Boy Surrenders Itself To Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..अन् तरुण-तरुणीला केले पोलिसांच्या स्वाधीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील गरुड मैदानावर बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलात आढळलेल्या एका तरूण-तरूणीला पोलिसांनी रविवारी नागरिकांच्या तक्रारीनंतर ताब्यात घेतले. चौकशी आणि जबाब घेतल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ‘आम्ही मित्र आहोत, डबा खाताना काहींनी कोंडले,’ अशी उत्तरे देऊन या त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

साक्री रोडवरील गरुड कॉम्प्लेक्सचा चुकीच्या कामांसाठी वापर होत असल्याची तक्रार एका व्यापार्‍याने 3 ऑगस्टला पोलिसांकडे केली होती. या संकुलात रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे काही दुकाने सुरू होती. संकुलातील दुसर्‍या मजल्यावर असलेल्या एका दुकानाचे उघडे शटर पाहून एक तरूण व तरूणी या दुकानात बसले होते. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर तेथे पोलिस आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी आपले नाव, पत्ता व वय सांगण्यासोबत कुटुंबीयांची माहिती दिली. संबंधित 20 वर्षीय तरुण हा जमनागिरी रोड परिसरात तर 19 वर्षीय तरुणी ही पारोळा रोड परिसरात राहते. घटनेनंतर दोघांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी, पोलिस निरीक्षक दीपक कोळी यांनी दोघांकडे चौकशी करण्यासोबत त्यांच्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली.

तरुणाचे आई-वडील मुंबईत राहतात. तर मुलीचे वडील गावी गेले होते. त्यामुळे तरुणाचा एक नातलग आणि तरुणीचे काका पोलिस ठाण्यात हजर झाले. चौकशी, जाबजबाब आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेहमीचेच प्रकार
तीन शाळांना लागून असलेल्या या मैदानावर नेहमीच गैरप्रकार होतात. गेल्या वर्षी या कॉम्प्लेक्समध्ये एका व्यापार्‍याला लुटण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी एका प्रेमीयुगुलाला कुटुंबीयांनी यथेच्छ बदडले होते. हे दोन्ही प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. याशिवाय महिलेसोबत अश्लील प्रकार करणार्‍याला नागरिकांनी चोप दिला होता. या परिसरातील गैरप्रकाराबाबत लोकसंग्राम पक्षातर्फेदेखील आंदोलन झाले होते.

‘ही तर माझी मैत्रीण’
संबंधित तरुणाने पोलिसांना ती मुलगी माझी मैत्रीण असल्याची कबुली देत, आम्ही कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीकडे विचारणा केली. त्या वेळी तरुणी म्हणाली ‘आमच्यात केवळ निखळ मैत्री आहे. त्याचे पोट दुखत असल्यामुळे मी डबा घेऊन गेले होते. डबा खाताना बाहेरून आम्हाला दुकानात कोंडण्यात आल्याचे या तरुणीने पोलिस प्रशासनाला सांगितले.

कारवाई होतच राहील
सार्वजनिक ठिकाणी होणारा कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. नागरिक अथवा व्यापार्‍यांनी याबाबत तक्रार दिल्यास संबंधितावर निश्चित ठोस स्वरूपात कारवाई करण्यात येईल. त्याकरिता नागरिकांनी पुढे आले पाहिजे. चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी