आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँड्रॉइड मोबाइलवरून अँप्स डाऊनलोड करण्याचे प्रमाण सर्वाधिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अँड्रॉइड मोबाइलवरून सर्वाधिक प्रमाणात वेगवेगळे अँप्स डाऊनलोड केले जातात. इंटरनेटचा वापर केला जात असल्याने हॅकर्स व्हायरसच्या माध्यमातून डेटा हॅक करतात. यामुळे नुकसानीची वेळ येऊ शकते. मात्र, अँड्रॉइड मोबाइलचा वापर करताना सुरक्षेच्या काही बाबी कटाक्षाने पाळल्या गेल्या तर हा धोका नष्ट होऊ शकतो. या संदर्भात ग्राहकांनी देखील वेळीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे.


वर्षभरात बाजारपेठ काबीज केली
गेल्या वर्षभरात अँड्रॉइड मोबाइलने संपूर्ण बाजारपेठ काबीज केली आहे. यातील फीचर्स आणि प्रचंड गतिमानता यामुळे हे मोबाइल झपाट्याने लोकप्रिय झाले. असामान्य स्पष्टता, अप्रतिम वॉलपेपर अशा नानाविध गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांमुळे युर्जसमध्ये लोकप्रिय असलेले अँड्रॉइड मोबाइल हॅकर्समध्येही लोकप्रिय आहेत. तेव्हा अँड्रॉइडचा वापर करताना सुरक्षितता जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

सुरक्षित अँप्स ओळखण्यासाठी
कोणते अँप्स सुरक्षित आहे किंवा नाही हे ओळखण्याचा सरळ उपाय म्हणजे प्रत्येक अँपच्या खाली युजरने आपली कॉमेंट्स लिहिलेली असते. यावरून हे अँप सुरक्षित आहे की नाही याचा अंदाज बांधता येतो. एखाद्या अँपला जर सर्व कॉमेंट्स सकारात्मक आढळून आल्या तर समजावे की हे अँप खोटे आहे. ज्या ठिकाणी सकारात्मक, नकारात्मक दोन्ही प्रकारच्या कॉमेंट्स आहेत ती अँप्स सुरक्षित असू शकतात.

अँटी व्हायरस असायलाच हवा
व्हायरसपासून मोबाइल वाचवण्यासाठी अनेक अँटी व्हायरस उपलब्ध आहेत. यामध्ये एस मोबाइल सिस्टिम्स, सिक्युरिटी शिल्ड, वेब सिक्योर आणि अँड्रॉइड अँटी व्हायरस हे उपलब्ध आहेत. हे अँटी व्हायरस मोबाइलमध्ये असलेल्या मेसेजेस, मेमरी कार्ड, ई- मेल्स आणि वेब कंटेंटलाही सातत्याने स्कॅन करून सुरक्षित करते.

नेहमी अपडेट राहा
अँड्रॉइडचे निर्माते कायम आपली माहिती अपडेट करत असतात. ही माहिती तुमच्या डिव्हाइसला सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सिद्ध होते. यासाठी सातत्याने अँड्रॉइडच्या सिस्टिम साइटवर जाऊन सुरक्षिततेचे अपडेट घेत राहा. अँड्रॉइड सिस्टिमला अपडेट ठेवण्यासाठी याच्या वेबसाइटवर येणारे लेख दर आठवड्यात वाचायला हवेत.

सुरक्षित स्रोतावरूनच डाऊनलोड करा
अँड्रॉइड मोबाइलसाठी इंटरनेटच्या माध्यमातून नवीन अँप्स डाऊनलोड करताना ते सुरक्षित साइटवरून आहे का याची खात्री करा. जर कुठलीही शंका असेल तर डाऊनलोडिंगचा मोह टाळा. कारण, असुरक्षित अँप्सच्या डाऊनलोडिंगने डिव्हाइस कायमचे खराब होऊ शकते.

युज इट स्मार्टली
अँड्रॉइड फोनला स्मार्ट फोन म्हटले जाते. त्यामध्ये असलेले अँप्स डाऊनलोड करताना आपल्या स्मार्ट बुद्धीचा सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करायला हवा. अनेकदा मित्राने केले म्हणून आपणही अँप्स डाऊनलोड करता, पण हे चुकीचे आहे. आपल्या ज्ञानात भर पडेल असेच अँप्स डाऊनलोड करा, यातून फोन सुरक्षित होतो, उगाचच त्यातील जागा भरली जात नाही. दिनकर बोरडे, आयटी तज्ज्ञ

सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे पासवर्ड
आपला पासवर्ड गुप्त ठेवायला हवा. सर्वप्रथम आपले डिव्हाइस सुरक्षित करा. मोबाइलला ऑटोलॉक सिस्टिम अँक्टिव्हेट करा. यासाठी कु ठलेही अँप्स डाऊनलोड करण्याची गरज पडत नाही. फोन सेटिंग आणि सिक्युरिटीमध्ये यासाठी सेटिंग्ज आहेत. पासवर्ड देताना अक्षरांसोबतच अंकांचाही वापर करा. पासवर्ड आपल्या कितीही जवळची व्यक्ती असेल तरीही अंदाज बांधू शकणार नाही, असा ठेवा.

स्मार्टफोनचा स्मार्टनेस
सुरक्षेच्या काही बाबी कटाक्षाने पाळल्या गेल्या तर टाळता येतो धोका; युर्जसच्या कॉमेंटवरून अँप्सचा अंदाज बांधता येतो