आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त जमावाने पेटवला मांस भरलेला ट्रक, वाहतूक ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महामार्गावरील बीबा नगरजवळील हॉटेल साई पॅलेससमोर मंगळवारी रात्री १०.१५ वाजेदरम्यान जनावराचे मांस भरलेला ट्रक संतप्त जमावाने पेटवला. यामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.

जळगावकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक (क्रंमाक एमएच १९ एस ३१६५) यामध्ये सुमारे क्विंटल वजनाचे जनावराचे मांस भरले होते. बर्फाच्या लाद्यांवर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हे मांस ठेवण्यात आले होते. या ट्रकमध्ये मांस वाहून नेत असल्याची माहिती मिळताच जमावाने या ट्रकचा पाठलाग केला. त्यानंतर साई पॅलेसजवळ ट्रक थांबवण्यात आला. ट्रक थांबताच जमावाने ट्रकची तोडफोड केली. या दरम्यान ट्रक चालक फरार झाला. ट्रकमध्ये मांस असल्याची खात्री झाल्याने संतप्त जमावाने ट्रक पेटवला, यात ट्रकचे दोन्ही चाकासह स्टेअरिंग इंजिनसह पुढील सर्व भाग जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठसह तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पेटत्या ट्रकला विझवले. तसेच पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी भेट देऊन वातावरण शांत केले.