आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अामदार चाैधरींची अनिल पाटील यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - पालिका निवडणुकीच्या वादातून येथील अामदार शिरीष चाैधरींनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल भाईदास पाटील यांना रविवारी बेशुद्ध हाेईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यानंतर पाटील समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत जण जखमी झाला. या वेळी वाहनांचे नुकसान झाले.
अमळनेर पालिकेसाठी मतदान सुरू असताना किरकाेळ कारणावरून दुपारी वाजता अामदार शिरीष चाैधरी अनिल भाईदास पाटील यांच्यात वाद होऊन शाब्दिक चकमक झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यात अामदार चाैधरींनी ताेंडावर, छातीवर बुक्क्यांनी मारहाण केल्याने अनिल पाटील हे घटनास्थळी बेशुद्ध झाले. साेबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने शहरातील डाॅ. निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात हलवले. डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना बेशुद्धावस्थेतच सीटी स्कॅन करण्यासाठी धुळे येथे हलवले. मात्र, ही माहिती गावात मिळताच अनिल पाटील समर्थकांनी नंदुरबार पासिंगच्या चारचाकी, दुकानांची माेडताेड केली. कचेरी राेडवरील अामदार चाैधरींच्या मालकीची इमारत, अामदारांचे संपर्क कार्यालयावर दगडफेक केली. अामदारांच्या कुटुंबीयांनीधुळे राेडवरील कल्याण पाटील या कार्यकर्त्याच्या घरात अाश्रय घेतला. परंतु, तेथेही ३.४५ वाजता दगडफेक झाली. ढेकू राेडवरील अामदार चाैधरींच्या निवासस्थानावरही दगडफेक झाली असून त्यांच्या वाहनाच्या काचा फाेडण्यात अाल्या. ठिकठिकाणी घाेळक्याने जमा झालेला शेकडाेंचा जमाव पांगवण्यासाठी पाेलिसांनी लाठी हल्ला केला. त्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. ललिता पाटील यांचा मुलगा पराग पाटील हा जखमी झाला.

धुळे राेडवरील माजी अामदार साहेबराव पाटील यांच्या ‘राजभवन’ या निवासस्थानी सायंकाळी वाजेपर्यंत शेकडाेंचा जमाव थांबून हाेता. शहरात बंदाेबस्त वाढवण्यात अाला. अार.के.नगरचा अपवाद वगळता इतरत्र मतदान सुरळीत झाले. पाेलिसअधीक्षक सुपेकर यांनी अामदार चाैधरींचे ढेकू राेडवरील निवासस्थान, अार.के.नगर, माजी अामदार साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन माहिती घेतली.

अाजमतमाेजणी :जिल्ह्यातील १२ पालिका अाणि बाेदवड नगरपंचायतीसाठी साेमवारी सकाळी १० वाजेपासून मत मोजणी सुरू हाेऊन, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट हाेणार अाहे.

कुटुंबीयांनीधुळे राेडवरील कल्याण पाटील या कार्यकर्त्याच्या घरात अाश्रय घेतला. परंतु, तेथेही ३.४५ वाजता दगडफेक झाली. ढेकू राेडवरील अामदार चाैधरींच्या निवासस्थानावरही दगडफेक झाली असून त्यांच्या वाहनाच्या काचा फाेडण्यात अाल्या. ठिकठिकाणी घाेळक्याने जमा झालेला शेकडाेंचा जमाव पांगवण्यासाठी पाेलिसांनी लाठी हल्ला केला. त्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. ललिता पाटील यांचा मुलगा पराग पाटील हा जखमी झाला. धुळे राेडवरील माजी अामदार साहेबराव पाटील यांच्या ‘राजभवन’ या निवासस्थानी सायंकाळी वाजेपर्यंत शेकडाेंचा जमाव थांबून हाेता. शहरात बंदाेबस्त वाढवण्यात अाला. अार.के.नगरचा अपवाद वगळता इतरत्र मतदान सुरळीत झाले. पाेलिसअधीक्षक सुपेकर यांनी अामदार चाैधरींचे ढेकू राेडवरील निवासस्थान, अार.के.नगर, माजी अामदार साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन माहिती घेतली.

अाज मतमाेजणी
जिल्ह्यातील १२ पालिका अाणि बाेदवड नगरपंचायतीसाठी साेमवारी सकाळी १० वाजेपासून मत मोजणी सुरू हाेऊन, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट हाेणार अाहे.

एरंडोल ७६
चाळीसगाव ६४.४२
पाचोरा ७२
पारोळा ७६
फैजपूर ७५.८५
सावदा ७३.४०
रावेर ८१
यावल ७४
धरणगाव ७२
चोपडा ७५.९५
भुसावळ ५८
अमळनेर ६८
बोदवड ७५.४९
^निवडणुकीत अामदारशिरीष चाैधरी यांच्या पत्नी उमेदवारी करीत अाहेत. त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी घटनास्थळी पाेहाेचलाे. त्या ठिकाणी पैसे वाटप हाेत असल्याचे दिसले. मी प्रांताधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांना फाेन केला. पैसे वाटप करणाऱ्यांना पकडून ठेवले हाेते. त्या वेळी अामदार शिरीष चाैधरी हे घटनास्थळी अाले. त्यांनी अाणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी मला बेदम मारहाण केली. त्यात मी बेशुद्ध झालाे. माझा माेबाइलही घेतला. -अनिल भाईदास पाटील, जखमी

अामदार पाेलिस ठाण्यात
घटनेनंतर अामदार शिरीष चाैधरी सरळ पाेलिस ठाण्यात जाऊन बसले. दुपारी ३.३० वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत ते पाेलिस ठाण्यात बसून हाेते. चाैधरींना अटक करावी, या मागणीसाठी रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत रास्ता राेकाे करण्यात अाला. पाेलिस प्रशासनाने ठाेस अाश्वासन दिल्यानंतर रास्ता राेकाे मागे घेण्यात अाला. दरम्यान, दाेन्ही गटांकडील फिर्याद नाेंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते. कुणालाही अटक करण्यात अालेली नाही. शहरात अतिरिक्त पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे.

एसपी घटनास्थळी
तणावाची माहिती मिळताच जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार हाेऊ म्हणून उपायाेजना सुरू केल्या.

राज्यात ७० टक्के मतदान
राज्यातील २५ जिल्ह्यांमधील १६४ नगर परिषद नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १४७ थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठी रविवारी सरासरी ७० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...