आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल चौधरींना आठवडाभर भुसावळ शहरबंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई झालेले माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना 6 ते 13 जून या कालावधीत शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राहुल मुंडके यांनी शुक्रवारी सायंकाळी हे आदेश काढले. यामुळे चौधरी यांना न्यायालयीन तारखेवर सुद्धा हजर राहता येणार नाही, अशी माहिती प्रांताधिकारी मुंडके यांनी दिली.

शहरातील राजकीय स्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चौधरींना शहरात प्रवेश नको, असा अहवाल पोलिस प्रशासनाने दिला होता. या अहवालावर मुंडके यांनी वरील आदेश काढले.

बाजारपेठ पोलिसांनी या आदेशाची चौधरींना माहिती दूरध्वनीवरून कळवली. तसेच उपविभागीय दंडाधिकारी मुंडके यांनी न्यायालयासही चौधरींना शहर बंदीबाबतचे विनंती पत्र दिले आहे.