आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Choudhari News In Marathi, Girish Mahajan, BJP, Jalgaon, Divya Marathi

आमदार गिरीश महाजन यांच्या प्रेमापोटी भाजपमध्ये आलो - अनिल चौधरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - आमदार गिरीश महाजन यांच्या प्रेमापोटी भाजपमध्ये आल्याचे स्पष्ट करून दस्तूरखुद्द अनिल चौधरी यांनीच रविवारी सर्व शंका-कुशंकाना पूर्णविराम दिला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महाजन यांच्या उपस्थितीत भाजपचा फत्तेपूर गटातील कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अनिल चौधरी उपस्थित होते. मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.


महिन्याभरापासून अनिल चौधरींचे भाजपा प्रवेशनाट्य चर्चेचा विषय झाला होता. आधी ‘काम करा, मग विचार करू’ असे सांगून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी चौधरींच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लावला होता. त्यानंतरही चौधरी हे काही दिवस भाजपपासून अंतर ठेवून होते; मात्र रविवारी फत्तेपूरच्या मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सहा महिन्यांपासून ते आमदार महाजन यांच्या संपर्कात होतो; आणि त्यांच्यावरील प्रमापोटीच भाजपमध्ये आल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. भुसावळ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह दिले; मात्र चौधरी कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नाही, अशी अट घातली होती. आम्ही ती अट मान्य करून भुसावळात सत्ता देत जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवली. या वेळी खासदार जैन व मनीष जैन यांचे नाव न घेता ‘कर्तृत्व शून्य माणसे, पैशांच्या जोरावर मतदान विकत घेण्याचा प्रय} करतात’ अशी टीका चौधरी यांनी केली.


भुसावळकरांची मांदियाळी
फत्तेपूर येथे रविवारी झालेल्या भाजप मेळाव्यासाठी स्थानिक नेत्यांसह भुसावळ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. वसंतराव झारखंडे, भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक अशोक चौधरी, माजी नगरसेवक रामदास सावकारे, रवींद्र लेकुरवाळे, कैलास महाजन आदींनी हजेरी लावली होती.