आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Gote News In Marathi, MLA, Dhule, Divya Marathi

आमदार गोटेंनी बदलली भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धनगर समाजाच्या महायुतीला वेठीस धरून नोटा बटणाचा वापर करण्याचा निर्णय घेणार्‍या आमदार अनिल गोटे यांनी भूमिका बदलली आहे. आपण महायुतीसोबत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी आमदार गोटेंच्या निवासस्थानी घेतलेल्या बैठकीनंतर गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेला दुरावाही भ्रमणध्वनीवरून दूर केला.


धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचा शब्द भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी पाळला नाही. यामुळे धनगर समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत धनगर समाजातील मतदार ‘नोटा’चा वापर करणार असल्याची भूमिका आमदार गोटे यांनी घेतली होती. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतही या भूमिकेवर ते ठाम होते. मात्र, सोमवारी झालेल्या घडामोडींनंतर सकाळी महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे सरचिटणीस आमदार जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, अद्वय हिरे, सुरेश पाटील यांनी आमदार गोटे यांची त्यांच्या घरी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेनंतर आमदार गोटे यांनी भूमिका मवाळ करीत महायुतीसोबत राहण्याचा निर्णय ंघेतला. याबाबत राम जेठमलानी यांच्यामार्फत नरेंद्र मोदींचा निरोप आणि गोपीनाथ मुंडे यांच्याकडून करण्यात आलेल्या खुलाशानंतर भूमिका बदलली असल्याचे गोटे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.