आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: जवखेडा गावाजवळ मोटारसायकलीच्या धडकेत एक काळवीट ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - जवखेडा गावाजवळ मोटारसायकलीच्या धडकेत एक नर जातीचे काळवीट ठार झाल्‍याची घटना बुधवारी घडली. या धडकेत मोटारसायकलस्वार सदाशिव देविदास पाटील हे  देखील जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अनोरे जवखेडा रस्त्यावर ही घटना घडली. काळवीट अचानक धावत रस्‍त्‍यावर आले असावे, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. ही घटना नागरिकांच्‍या लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी ही माहिती वनविभागाला कळवली. त्यानंतर वनरक्षक डी के जाधव, व महिंदळे भागाचे वनरक्षक विजय माळी हे याठिकाणी उपस्थित झाले. ही माहिती पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात आल्यानंतर अमळनेर येथील पशुधन अधिकारी डॉ व्ही बी भोई यांना मृत काळवीटची शवचिकित्सा केली व त्यानंतर त्याला अग्निडाग देण्यात आला.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा घटनेचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...