आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - तिखी शिवारातील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना देवपूर परिसरातील अल्पवयीन मुलीवरही बलात्कार झाला आहे. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुण घटनेनंतर पसार झाला आहे.

तिखी शिवारातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने समाजमन सुन्न झालेले असताना पुन्हा एक अल्पवयीन मुलगी नराधमाच्या वासनेला बळी पडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील किसान पाइप फॅक्टरीजवळ राहणार्‍या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जीवनसिंग रामसिंग सोनवणे याने वेळोवेळी बलात्कार केला. तसेच याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी या मुलीला देण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे भेदरलेल्या या मुलीने घरी सांगितले नाही. दरम्यान गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला. यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने खरा प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून देवपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 376-(2) (1), 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी देवपूर पोलिस ठाण्यात भेट दिली.