आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण विरोधी मोहिमेला नवीन वर्षातच मिळेल मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने पाेलिसांकडे बंदाेबस्ताची मागणी केली हाेती. १९ ते २१ सप्टेंबर या काळात मोहीम राबवण्याचे नियोजन मुख्याधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, पाेलिस प्रशासनाने बंदोबस्त पुरवण्यास नकार दिल्याने, पालिकेने केलेल्या नियोजनावर पाणी फिरले आहे.
यासंदर्भात बाजारपेठ पाेलिस ठाण्यातर्फे साेमवारी जिल्हा पाेलिस अधीक्षकांना पत्र देण्यात आला आहे. आगामी काळातील सणवारांमुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे सणवार झाल्यानंतर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी तत्कालीन कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन बंदाेबस्त पुरवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमेला तूर्त ब्रेक लागला अाहे. यामुळे शहरातील अतिक्रमणधारकांना काहीअंशी दिलासा मिळाला अाहे. शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रण काही काळापुर्वी पालिकेने काढले होते. मात्र, पालिकेचे दुर्लक्ष होताच पुन्हा अतिक्रमणाचे प्रकार वाढले आहेत.
केंद्रशासनाच्या राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत हॉकर्स झोन उभारणीकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. अतिक्रमणविरोधी मोहीम राबवल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण खासगी आर्किटेक्टच्या मदतीने करून जागांची निश्चिती करण्यात आली होती. मात्र, यानंतर अद्यापही बेरोजगारांना हक्काची जागा मिळालेली नाही.

पालिकेने शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढले. राज्यातील सर्वच पालिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही मोहीम राबवणे अनिवार्य होतेच. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उपजिविका अभियानातून अतिक्रमणात बेरोजगार झालेल्या व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोनची उभारणी करण्याचे नियोजन आहे. यासाठी पालिकेत स्वतंत्र यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील खासगी आर्किटेक्टकडून यावल, जळगाव, वरणगाव, जामनेर आठवडेबाजार या रस्त्यांवरील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
आर्किटेक्ट बांधवांनी पालिकेकेडून दमडीही घेता मदत म्हणून याबाबतचे सर्वेक्षण करून दिले. यावर पुन्हा पालिकेकडून सर्वेक्षण करून यातील समान जागा हॉकर्स बांधवांना दिली जाणार होती. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील आठवडे बाजारात असलेल्या हॉकर्सबांधवांना बलबलकाशी नाल्यावर हॉकर्स झोन उभारणीचे आश्वासन देण्यात आले आहे. या महत्वकांक्षी कामालाही अद्याप गती मिळालेली नाही. नाल्यावर हॉकर्स झोन झाल्यास शहराचे सौंदर्य वाढून बाजारात गर्दी कमी होईल, मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

^सणवारांचा काळअसल्याने पाेलिस बंदाेबस्त उपलब्ध करून देणे शक्य हाेणार नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षकांकडे यासंदर्भात अहवाल पाठवला अाहे. आगामी काळात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून मोहिमेसाठी बंदाेबस्त पुरवला जाईल. -राेहिदास पवार, डीवायएसपी, भुसावळ

डीवायएसपींमार्फत दिला अहवाल
शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी बंदाेबस्त नाकारण्याबाबत डीवायएसपी राेहिदास पवार यांच्या माध्यमातून बाजारपेठ पोलिसांनी अधीक्षकांना अहवाल दिला. पालिका निवडणुकीच्या ताेंडावर अतिक्रमण काढण्याचा विषय समाेर अाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. एेन निवडणुकीच्या काळात अतिक्रमण काढल्यामुळे जनतेचा राेष वाढेल अशी भीती शहरातील राजकीय जाणकारांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...