आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काला उपचारासाठी दरमहा आर्थिक मदत देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर- थॅलेसिमिया आजाराने त्रस्त असलेल्या रावेरच्या अनुष्का चौधरी (वय ७) या बालिकेच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. यानंतर अाता संजय गांधी निराधार योजनेतून अनुष्काला दरमहा आर्थिक मदत देण्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी शनिवारी जाहीर केले, अशी माहिती संजय गांधी निराधार योजना विभागातील अव्वल कारकून संगीता घोरपडे यांनी दिली. ‘सातवर्षीय अनुष्काला ९७ वेळा दिले रक्त’हे वृत्त ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले आहे. या बातमीची दखल मुख्यमंत्र्यांनी तातडीने घेतली. अनुष्कावरील बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी १५ ते १७ लाखांचा खर्च येणार आहे. एवढा खर्च करण्याची क्षमता नसल्याने अनुष्काचे वडील ज्ञानेश्वर चौधरी यांची चिंता वाढली होती. ‘दिव्य मराठी’च्या प्रयत्नांमुळे अनुष्काच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनुष्काचे वडील ज्ञानेश्वर चौधरी, काका सूरज चौधरी पंकज चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’च्या जळगाव कार्यालयात जाऊन आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...