आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांनी अनुभवला ‘हिट अॅण्ड रन’चा थरार; भरबाजारात सुसाट अॅपेने तरुणीला उडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - तरुणीला उडवल्यानंतर अॅपे रिक्षा थेट विद्युत डीपीला धडकली. त्यामुळे रिक्षाचे झालेले नुकसान.
जळगाव - गोलाणी मार्केटसमोरील इंडो अमेरिकन हॉस्पिटलच्या परिसरात म्हणजे भर बाजारात नागरिकांनी शुक्रवारी दुपारी २.२० वाजता ‘हिट अॅण्ड रन’चा थरार अनुभवला.चित्रा चौकाकडून सुसाट आलेल्या एका अॅपेरिक्षाचालकाने मोपेडवर जाणाऱ्या एका तरुणीला त्याचबरोबर फळांच्या दोन गाड्यांना उडवले. गाड्यांना उडवत निघालेली ही रिक्षा थेट ट्रान्सफॉर्मच्या खांबाला जाऊन धडकली.
ही गाडी खांबाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला. तरुणीला धडक दिल्याने ती रस्त्यावर पडली होती. या वेळी तिच्या रिक्षाचे चाक तिच्या मानेपर्यंत आले होते पण तिथे उभे असलेल्या तरुणांनी तरुणीला वेळीच बाजूला खेचल्याने तिचे प्राण वाचले.दरम्यान घटना घडल्यानंतर नागरिकांनी पोलिसात तत्काळ माहिती दिली पण ते वेळेत न आल्याने गोंधळाचा फायदा घेत ऐक्षाचालक पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही.

कोर्ट चौकाकडून चित्रा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ अन् नागरिकांची गर्दी असते. शुक्रवारी दुपारी २.२० वाजता योगिता सुकलाल कोल्हे (वय १९, रा. आसोदा) ही तरुणी तिच्या महिंद्रा रेडिओ (क्रमांक एमएच-१९- एझेड-७२२२) ने शिवतीर्थाकडून इंडो अमेरिकन हॉस्पिटलकडे जात होती. त्यामुळे तिने उजवीकडे वळण्यासाठी इंडिकेटर दिले. याच वेळी चित्रा चौकाकडून समोरून वेगात येणाऱ्या अॅपेरिक्षा (क्रमांक एमएच-१९- व्ही-१७२२) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने योगिताला धडक दिली. त्यामुळे ती रस्त्यावर पडली तिच्या मानेपर्यत गाडीचे चाक आले होते. पण घटनास्थळी उपस्थित तरुणांनी योगिताला वेळीच बाजूला ओढल्याने तिचे प्राण वाचले. त्यानंतर इंडो अमेरिकन हॉस्पिटलच्या कंपाउंडजवळ उभ्या असलेल्या शेख करीम शेख गुलाब याची चिकूची आणि आंब्याची, अरिफ मुस्तफा यांच्या केळीच्या गाड्या उडवल्या. यात चिकूचे, २५ डझन केळीचे आणि आंब्यांचे नुकसान झाले. घटनेबाबत नागरिकांनी पोलिसात माहिती दिली पण ते वेळेवर न पोहचल्याने रिक्षाचालक पळून गेला. दरम्यान रिक्षाचालकाने फळविक्रत्यांशी आपसात समजोता केल्याने पोलिसात गुन्हा मात्र दाखल झाला नाही.

काहीच कळले नाही

^मी नेहमीप्रमाणे फळविक्री करीत होतो. शुक्रवारी दुपारी अचानक एक अॅपेरिक्षा गाडीला धडकली. त्यामुळे मला थोडा वेळ काहीच कळले नाही. सुदैवाने बाजूला उभा असल्याने काही दुखापत झाली नाही. करीमशेख, फळ विक्रेता
मानेपर्यंत चाक आले होते

मी उजव्या बाजूचे इंडिकेटर दिले. पण, रिक्षावाल्याला ते दिसले नाही. त्यामुळे त्याने सरळ गाडीला धडक दिली. त्यामुळे मी खाली पडले. रिक्षाचे चाक मानेपर्यंत आले होते. मात्र घटनास्थळावर उभ्या असलेल्या काही तरुणांनी वेळीच मला बाहेर ओढले. योगिता कोल्हे, अपघातातील जखमी तरुणी
पुढील स्लाइडवर पाहा अपघाताचे फोटो...