आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव ‘आप’ मधील बंडाळी दिल्लीच्या मार्गावर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दिल्ली विधानसभेतील यशानंतर पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेऊ पाहणाऱ्या आम आदमी पार्टीतील शहरातील अंतर्गत बंडाळी दिल्लीच्याच मार्गावर जाण्याच्या तयारीत अाहेत. दिल्लीमध्ये पक्षात वाढलेल्या कलहाचे लाेण आता जळगावपर्यंत पसरले आहे. उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक असलेल्या रवी श्रीवास्तव यांनी जळगावची शहर अाणि ग्रामीण कार्यकारिणी जाहीर केली आणि अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली. सोशल मीडियावर शिगेला पोहोचलेली भाऊबंदकी चव्हाट्यावर येण्यासाठी असंतोषाचे जनक ठरलेल्या पदाधिकाऱ्यांच्या शोधात आहेत.
दिल्लीत उदयास आलेल्या अापच्या कार्यात झोकून देणाऱ्यांमध्ये जळगावातील कार्यकर्त्यांचादेखील मोठा सहभाग आहे. गेल्या वर्षभरात जळगावमध्ये अनेक लोक या पक्षाकडे धावले, काही परत आले, काही अजूनही आहेत. पक्षाने अवघ्या एक वर्षाच्या काळात पाहिलेले चढ-उतार, राजकीय संघर्षापासून जळगावही दूर राहिले नाही. गेल्या महिन्यात दिल्लीत पुन्हा सत्ता आल्यानंतर पक्षातील अंतर्गत भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. पक्षसंघटनेसाठी उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असलेले रवी श्रीवास्तव यांनी जळगावात भेट देऊन संघटनासाठी एक योजना जाहीर केली. त्याअंतर्गत त्यांनी शहर अाणि ग्रामीणची कार्यकारिणीदेखील जाहीर केली आहे. शहर कार्यकारिणीवरून पक्षात उभी फूट पडण्याची वेळ आली आहे.
पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर एका ग्रुपमध्ये केलेले मंथन पक्षातील कलहाची तीव्रता दर्शवणारे आहेत. पक्षाला भरघोस लाखाचा पक्ष निधी देणारे डाॅ. सुनील गाजरे, सरचिटणीस प्रतीक्षा जंगम, सिद्धार्थ सोनाळकर, शिवराम पाटील, चाळीसगावचे प्रा. गौतम निकम, उत्तर महाराष्ट्राचे माजी समन्वयक संजय साने, अंजली दमानिया, राहुल भारती, प्रतिभा शिंदे, राजीव शर्मा, शेखर सोनाळकर, मुकेश अग्रवाल हे सोशल मीडियावरील अापच्या कार्यकर्त्यांच्या चर्चेचे विषय आहेत. काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर, काहींनी समन्वयक रवी श्रीवास्तव यांच्यावर तर काहींनी थेट पक्षाच्या ध्येय-धाेरणावरच संशय व्यक्त केला करून लोकसभा निवडणुकीत पदे गेल्याचा आराेप केला आहे.

संघर्षाची ठिणगी पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर भाष्य
आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्षाची महाराष्ट्रातील अवस्था, जळगावातील काम, पक्षाला मिळणारे डोनेशन यासंदर्भात महाराष्ट्र काैन्सिल आणि जळगाव कार्यकर्त्यांच्या ग्रुपमध्ये संभाषण झाले आहे. त्यात प्रत्येकाने आलेले अनुभव कथन केले आहे. तर काहींनी पक्षाची अवस्था आणि पदाधिकाऱ्यांचे वर्तन यावर भाष्य केले आहे.

लवकरच बैठक
पक्षातीलअसंतोष वाढत असल्याने डावलल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरच बैठक आयोजित केली जाणार अाहे. पक्षातील प्रकार माध्यमांसमोर आणून ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी’ असे करण्याची काहींनी सूचना केली आहे. त्यावर लवकरच िनर्णय होण्याची शक्यता आहे.