आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय इंगळे यांना शनिवारी अाप्पासाहेब पवार पुरस्काराने गौरविण्‍यात येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कृषी क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार अकाेल्याचे विजय इंगळे पाटील यांना जाहीर झाला अाहे. हा पुरस्कार 9 राेजी दुपारी दुपारी १.३० वाजता जैन हिल्स येथे प्रदान करण्यात येईल. या सोहळ्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवाणी, स्मिता वाघ, सतीश पाटील, गुलाबराव पाटील, संजय सावकारे, किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, उन्मेष पाटील शिरीष चौधरी उपस्थित राहणार आहेत.

सन्मान चिन्ह, दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारार्थींच्या निवडीसाठी माजी कुलगुरू डॉ. एस.एस. मगर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी शास्त्रज्ञांची निवड समिती नेमली हाेती.समितीने पुरस्कार अकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी विजय आत्माराम पाटील (इंगळे) यांना देण्याचा निर्णय घेतला.