आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Application For Transfer Rayte; Fielding Planted Interested

रायतेंचा बदलीसाठी अर्ज; इच्छुकांनी लावली फिल्डिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; जिल्हापाेलिस दलातील सर्वात महत्त्वाचा अाणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा विभाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेकडे बघितले जाते. परंतु, दीड महिन्यापासून एलसीबीचा कारभार वाऱ्यावर अाहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी एलसीबीची कमांड नवीन शिलेदाराच्या हातात साेपवली जाण्याची शक्यता अाहे. दरम्यान, सध्याचे पाेलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी बदलीसाठी नाशिक परिक्षेत्राचे पाेलिस महानिरीक्षक जयजित सिंगांकडे विनंती अर्ज केला अाहे. त्यामुळे या जागेसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली अाहे.

दीड महिन्यापासून एलसीबीच्या गुन्ह्यांचा तपास दिशाहीन झालेला अाहे. सादरे आत्महत्या प्रकरणामुळे गुन्हे शाखेचे गेलेले नियंत्रण काही केल्या अावाक्यात येताना दिसत नाही. त्यातच भर म्हणजे विद्यमान निरीक्षक प्रभाकर रायते यांनी स्वत:हून बदलीचा निर्णय घेत वरिष्ठांना याबाबत विनंती अर्ज सादर केला आहे. त्यामुळे अाता या ‘हाॅटसीट’साठी रांगा लागल्याचे पाहण्यास मिळत अाहे.

रायतेंनी मागितले नांदेड परिक्षेत्र : एलसीबीचेनिरीक्षक प्रभाकर रायते यांनी नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक जयजित सिंग यांच्याकडे १६ नाेव्हेंबरला विनंती बदलीसाठी अर्ज सादर केला आहे. त्यात त्यांनी नांदेड परिक्षेत्रात काेणतीही नियुक्ती मागितली अाहे. गुन्हे शाखेचे वास्तव समाेर येणाऱ्या बातम्या येऊ लागल्याने अधीक्षक कार्यालयातील उत्तरेकडील प्रवेशद्वारही बंद केले अाहे. नियंत्रण कक्षातील तसेच एलसीबीच्या बातम्या देण्यासाठी जिल्हा विशेष शाखेतील नाेडल अाॅफिसरची नेमणूक करण्यात अाली अाहे. हे सर्व कशासाठी तर, पोलिस दलात जी धुसफुस सुरू आहे किंवा गुन्हे शाखेतील अंतर्गत फेरबदलाची बोंबाबाेंब होऊ नये, म्हणून केलेला प्रयत्न म्हणायला हरकत नाही.

यांनीगाजवली कारकीर्द : राजेंद्रदेशमुख, सुभाष पटेल, नाना घुगे आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अधिकारी वाय.डी.पाटील, डी.डी.गवारे आदी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर याच खुर्चीवरून नियंत्रण मिळवले. रायते यांच्या काळातही चाळीसगाव दराेडा, कारचाेरांची टाेळी, अशा अनेक माेठ्या गुन्ह्यांची उकल झाली. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून एलसीबीच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी सुमार झाल्याचे िचत्र अाहे.

कामगिरी सुमार : जिल्ह्यातनव्हे, तर राज्यात गाजलेले घरकुल, पीयुष शामनानी अपहरण प्रकरण, या काळात परिस्थिती यशस्वी हाताळली गेली. आता मात्र एलसीबीची दृष्ट लागल्यासारखी अवस्था झाली आहे. ३० कर्मचाऱ्यांवर देशपातळीच्या गुन्ह्यांचा तपास लावणाऱ्या ह्याच गुन्हे शाखेत सध्या शंभरावर कर्मचारी अाहेेत. मात्र, त्यांची कामगिरी वॉरंट समन्स बजावण्यापुरती मर्यादित झाली आहे.

कारभार वाऱ्यावर
एलसीबीसाठी जिल्ह्यातील चार ते पाच अधिकाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावली अाहे. त्यात सर्वात अघाडीवर शहर वाहतूक शाखेचे चंंद्रकांत सराेदे, एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे प्रभारी सुनील कुराडे अाणि शहर पाेलिस ठाण्याचे नवलनाथ तांबे यांची नावे चर्चेत अाहेत. तांबे यांनी विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून, कुराडे यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीयांकडून तर सराेदेंसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली अाहे. मुक्ताईनगरचे प्रभारी राजेशसिंह चंदेल यांनीही खडसेंकडे फिल्डिंग लावल्याचे वृत्त अाहे. मात्र, सध्या त्यांचे नाव मागे पडले अाहे.