आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डिस्चार्ज’आधीच अर्ज अयोग्य, सुरेश जैन यांच्या अर्जावर सरकारी वकिलांचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याआधीच आपणास कोठे हलवावे, यासंदर्भात अर्ज करणे अयोग्य आहे, असा खुलासा गुरुवारी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी सादर केला. 8 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जळगाव कारागृहात हलविण्यात यावे, असा अर्ज आमदार जैन यांनी केला होता. या अर्जावर गुरुवारी न्यायाधीश एन.आर.क्षीरसागर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात सरकारपक्षातर्फे अँड. सूर्यवंशी यांनी खुलासा सादर केला. यात म्हटले आहे की, आमदार जैन सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर कुठे, कोणत्या कारागृहात जावे हा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल. यासाठी जिल्हा न्यायालयात याबाबत काहीही कामकाज करणे योग्य नाही. तसेच डिस्चार्ज मिळण्याआधीच कोणत्या कारागृहात ठेवावे, याबाबत अर्ज करणे योग्य नाही. आमदार जैन यांनी डिस्चार्ज घेतल्यानंतर त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांनी आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांमार्फत अर्ज करून जळगाव कारागृहाची मागणी करावी. त्यावर आरोपीतर्फे अँड.अकिल इस्माईल यांनी हा अर्ज कायद्याला धरून आहे. अशाच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हवाला दिला. या अर्जावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.
3 महिन्यांनंतर पुन्हा जेलमध्ये
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मयूर यांना स्वाइन फ्लू झाला होता. त्यामुळे त्यांना 25 एप्रिलला 15 दिवसांसाठी तात्पुरता जामीन देण्यात आला. तेव्हापासून त्यांनी न्यायालयात वेळोवेळी अर्ज करून जामिनाची मुदत वाढवून घेतली होती. 25 जुलैला खंडपीठाने त्यांचा तात्पुरता जामिनीचा अर्ज फेटाळून लावत शुक्रवारी कारागृहात हजरचे आदेश दिले. त्यामुळे तीन महिन्यांनंतर मयूर पुन्हा कारागृहात दाखल होतील.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी कारागृहातून सुटका मिळवलेले घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी राजा मयूर यांचा तात्पुरता जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी फेटाळला. मयूर यांनी शुक्रवारी 11 वाजेच्या आत जळगाव कारागृहात हजर राहावे, असे आदेशही खंडपीठाने दिले.
जामीन अर्जांवर सोमवारी सुनावणी
आमदार सुरेश जैन, राजा मयूर आणि जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जांवर खंडपीठात न्यायाधीश पी.व्ही.नलावडे यांच्या न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. यात वाणी यांचा सुरेश जैन यांच्याशी, तर सुरेश जैन यांचा नगरपालिकेशी संबंध नसल्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांतर्फे करण्यात आला; मात्र न्यायालयाने या खटल्याची ट्रायल का सुरू होत नाही? असा प्रo्न सरकार पक्षाला विचारला. त्यावर सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी खुलासा दिला की, खटला चालवण्यासाठी यापूर्वीच सरकार पक्षातर्फे साक्षीदारांना समन्स पाठवण्याचे विनंती अर्ज सादर केले आहे; परंतु त्यावरील निर्णयास विलंब होत असल्यामुळे खटला सुरू होण्यात अडचणी येत आहेत, असे सांगितले. या जामीन अर्जांवर सरकार पक्षातर्फे अँड.चव्हाण सोमवारी युक्तिवाद करणार आहेत. गुरुवारी आरोपींतर्फे अँड.पी.एम.शाह, अँड.राजा ठाकरे आणि अँड.नितीन सूर्यवंशी यांनी काम पाहिले.