आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात विशेष पथके रोखणार तालुक्यात वाळूतस्करी, पंचनामा करून पथक अहवाल सादर करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरासह तालुक्यातील वाळूस्थळांवरून वाळू उचलण्याच्या लिलावाची मुदत 30 सप्टेंबरला संपली आहे. मात्र, त्यानंतरही अवैधरीत्या वाळू वाहून नेणे सुरूच असल्याने गत तीन दिवसांत नऊ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील सहा वाहनमालकांकडून 85 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, अशा प्रकारची कारवाई यापुढेही करण्यासाठी सात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा सर्वच ठिकाणी वाळू उत्खननाचे प्रमाण वाढले असून, पोलिसांत अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत.
मात्र, त्यानंतरही वाळूतस्करांनी उत्खनन सुरूच ठेवले आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आता विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके ज्या दिवशी ज्यांची नेमणूक असेल त्या दिवशी संबंधित परिसरात वाळू वाहतूक साठा आढळून आल्यास जागेवरच पंचनामा करून उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना अहवाल सादर करणार आहेत.
तीनपटदंड आकारणार
अवैधवाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर किंवा डंपर ताब्यात घेतल्यानंतर पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहनात असलेल्या वाळूच्या बाजारभावापेक्षा तीनपट जास्त रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. याशिवाय ताब्यात घेतलेली वाहने लवकर परत दिली जाणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे.

कठोर कारवाई करणार

अवैधवाळू वाहतूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. वाळूतस्करी थांबवण्यासाठी कठोर कारवाईची सूचनाही देण्यात आली आहे. महेंद्रमाळी, नायबतहसीलदार (महसूल)
जप्त करून तहसील कार्यालयात अाणलेले रेतीचे ट्रॅक्ट्रर्स.
अशी आहेत पथके
नियुक्तकेलेल्या पथकांचे प्रमुख वेगवेगळ्या ठिकाणचे मंडळाधिकारी आहेत. सोमवारी पिंप्राळ्याचे मंडळाधिकारी पी.डी.मांडे, मंगळवारी जळगावचे ए.एफ.जोशी, बुधवारी नशिराबादचे आर.एस.भंगाळे, गुरुवारी म्हसावदचे राहुल नाईक, शुक्रवारी आसोद्याचे के.डी.रासने, शनिवारी जळगावचे एस.के.सोनवणे आणि रविवारी जळगावचेच डी.बी.जाधव यांची पथके गस्त घालणार आहेत.
कर्मचाऱ्यांवरही लक्ष
यामोहिमेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारी पथकप्रमुखांची आहे. तसेच या कामात हलगर्जीपणा करणारे पथक सदस्य किंवा कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार शिंदे यांनी दिले आहेत.