आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर दोन असो वा सात किलोमीटर रिक्षा भाडे 15 रु.; चालकांची मनमानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात रिक्षाचालक युनियनतर्फे गेल्या १५-२० दिवसांपासून अचानक सरसकट ५० टक्के भाडेवाढ करण्यात अाली अाहे. यासाठी त्यांनी जिल्हा परिवहन प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तर पेट्रोल, टॅक्स, विमा, देखभाल खर्च वाढल्यामुळे भाडेवाढ करीत असल्याचे रिक्षा युनियनचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात वाहनाचा विमा वगळता इतर बाबीत कुठलीही वाढ झाली नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतलेल्या माहितीतून पुढे आले अाहे. 

 

जळगाव शहरात काेणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. तसेच अाैद्याेगिक वसाहतीत राेजगाराच्या मुबलक संधीही उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहरात राेजगाराचे प्रमुख साधन म्हणून हजाराेंच्या संख्येने तरुण रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. या रिक्षांच्या जळगाव शहरात तीन ते चार युनियन अाहेत. त्याचप्रमाणे अधिकृत ४७ रिक्षा थांबे असताना दीडशेच्यावर अनधिकृत रिक्षा थांबे शहरात अाहेत. अनेक चाैकांत चारही बाजूने रिक्षा थांबे अाहेत. त्यामुळे वाहतुकीची काेंडी ही नित्याची बाब ठरली अाहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात वाहतूक शाखेला यश अालेले नाही. 

 

कमी अंतरासाठी कमी भाडे घेणे अपेक्षित : महागाई वाढल्याचेही कारण पुढे करून भाडेवाढ केल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत अाहे. त्याचा विचार केल्यास काही प्रमाणात भाडेवाढ करणे नैसर्गिक असले तरी सरसकट भाडेवाढ गैर अाहे. जुने स्टॅण्ड ते गणेश काॅलनी, बसस्थानक, सिंधी काॅलनी, अजिंठा चाैफुली हे अतंर केवळ तीन किमीच्या अात असताना त्यांच्यासाठी १५ रुपये घेणे अवाजवी अाहे. यासाठी कमी भाडे घेण्यात यावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त हाेत अाहे. 

 

युनियनने बैठकही घेतली नाही 
रिक्षाभाडेवाढ करण्याबाबत शहरातील काेणत्याही रिक्षा युनियनने सर्व सदस्यांची एकत्रित बैठक घेतली नाही. सर्वांना माहिती देऊन किंवा त्याबाबत चर्चा करणे अपेक्षित असताना तसे करता परस्पर भाडे वाढ केल्याचे काही रिक्षाचालक खासगीत सांगतात. त्यामुळे कमी अंतरासाठीही काहीजण १५ रुपये भाडे अाकारतात तर काहीजण १० रुपये घेतात. त्यामुळे रिक्षाचालक प्रवासी यांच्यात वाद हाेत अाहेत. 


1 मे २०१० पासून प्रत्येक वाहनाला एक रकमी टॅक्स भरावा लागताे. रिक्षेला वन टाइम टॅक्स हजार ८५० एवढा अाहे. ताे एकदाच भरावा लागताे. त्यामुळे टॅक्स वाढत नाही. रिक्षेला दरवर्षी पासिंग करावी लागते. अनेक रिक्षा पासिंग करता चालतात म्हणून अारटीअाेने दंडात्मक कारवाई सुरू केली हाेती. हा दंड पासिंग संपलेल्या दिवसापासून प्रति दिवसाला ५० या प्रमाणे अाकारला जात हाेता. त्यानुसार अनेकांना १० ते १५ हजारांपर्यंत दंड भरावा लागला. मात्र, संघटना याच्या विराेधात काेर्टात गेल्या हाेत्या. त्यांच्या बाजूने निकाल लागून काेर्टाने दंड अाकारणीला स्थगिती दिली अाहे. त्यामुळे पासिंगचे ६५० नियमित दंडाचे २०० रुपये असे ८५० रुपये भरावे लागतात. 

 

प्रस्ताव न देता केली दरवाढ 
रिक्षाचालक युनियनतर्फे दाेन दिवस अगाेदर रिक्षांच्या मागे भाडे १५ रुपये असे खडूने लिहण्यात अाले हाेते त्यानंतर रिक्षा भाडे वाढवण्यता अाले हाेते. त्यासाेबत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी अारटीअाे कार्यालयात जाऊन भाडेवाढीचे पत्र दिले, असे युनियनचे म्हणणे अाहे. मात्र, त्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हा परिवहन समितीकडे देणे अपेक्षित असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (अारटीअाे) यांचे म्हणणे अाहे. असा प्रस्ताव अाल्यानंतर त्यावर वस्तुनिष्ठ परिस्थितीचा विचार करून मान्यता द्यावी किंवा नाकारण्याचा अधिकार हा या प्राधिकरण समितीला असताे. त्यानंतरच भाडेवाढ करणे अपेक्षित असते. 

बातम्या आणखी आहेत...