आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तुविशारद सिकचींना ‘आशियाई पुरस्कार’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रेफी आणि रचना संसद या संस्थांतर्फे देण्यात येणारा वास्तु रेखाटन क्षेत्रातील आशियाई पातळीवरील पुरस्कार जळगावचे वास्तुविशारद संदीप सिकची यांना प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी आशिया खंडातून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. रेसिडेन्सिअल स्मॉल या प्रकारात सिकची यांनी पुण्यातील ‘आमराई’ या बंगल्याचे मॉडेल सादर केले होते. त्यांना सिंगापूरचे वास्तुविशारद चॉग यांच्या मॉडेलसोबत हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
रेफीतर्फे आर्किटेक्चरशी संबंधित विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविल्या होत्या. त्यात जळगावातील आर्किटेक्ट संदीप सिकची यांनी साकारलेले पुण्यातील ‘आमराई’ आणि जळगावचे ‘पदमावती निवास’ या दोन्ही वास्तुंचे मॉडेल सादर केले होते. दोन्ही प्रवेशिकांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. पुण्यात 6 ते 8 फेब्रुवारीदरम्यान झालेल्या सादरीकरणात सिकची आणि सिंगापूरचे चॉग यांच्या मॉडेलने बाजी मारली. दोन्ही मॉडेलमधून एकाची निवड करणे अशक्य असल्याने परीक्षकांनी दोन्ही मॉडेलला पहिल्या क्रमांकाचे संयुक्त पारितोषिक दिले. ऑस्ट्रेलियाच्या अँडम हॉडो, दक्षिण आफ्रिकेच्या जो नोरो, मुंबईच्या रवी हाजरा यांनी ही निवड केली. पुण्यात क्रिस्टोफर बेंनिंजर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
गांधी रिसर्च सेंटरलाही पुरस्कार
कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस या प्रकारात जैन हिल्सवर साकारलेल्या गांधी रिसर्च सेंटरला पुरस्कार देण्यात आला आहे. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रेफीतर्फे या विभागात स्पोर्ट युटिलिटी, कॉम्प्लेक्स, कर्मशिअल, कन्स्ट्रक्शन, इंटेरियर आदीसंबंधी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या.
आमराई अव्वल
रेसिडेन्शिअल स्मॉल या गटात कमी जागेचा वापर करून योग्य व्हेंण्टिलेशन, एनर्जी सेव्हिंग, नॅचरल लाईट, आकर्षक डिझाईन, ग्रीन बिल्डिंग, लोकल लेबर आदी गोष्टींचे निकष लावून 25 हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या प्रवेशिका मागविल्या होत्या. आर्किटेक्ट सिकची यांनी आपण साकारलेले कोथरूड येथील 3500 चौरस फुटांवरील आमराई आणि जळगावच्या मेहरूण रस्त्यावरील 28 हजार चौरस फुटांवरील पद्मावती निवास या वास्तुंचे मॉडेल सादर केले.