आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकाबंदीत अट्टल गुन्हेगार ताब्यात; दुचाकी, लॅपटॉप, मोबाइल हस्तगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पाेलिस अधीक्षकांच्या अादेशानुसार शहरातील विविध भागात नाकाबंदी करण्यात येते. त्यानुसार पश्चिम देवपूर पाेलिसांकडून गाेंदूर राेडवर करण्यात अालेल्या नाकाबंदीत अट्टल गुन्हेगार पाेलिसांच्या हाती लागले. त्यांनी शहरासह परिसरात केलेल्या चाेरीची कबुली दिली अाहे. त्यांच्याकडून दाेन चाेरीच्या माेटारसायकल, नऊ माेबाइल, लॅपटाॅप अाणि साेन्याचे दागिने असा सुमारे दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात अाल्याची माहिती पाेलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली.
शहरातील गोंदूर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलाजवळ नाकेबंदी करण्यात आली होती. या ठिकाणी पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रदीप पाडवी सहायक पाेलिस निरीक्षक व्ही. एस. खिरेकर यांच्या शाेध पथकातील कर्मचारी सहायक उपनिरीक्षक युवराज बाेरसे, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल वीरेंद्रसिंग िगरासे, अशाेक पवार, कैलास पवार, भूषण जगताप, संदीप कदम, संदीप पाटील, वाहनचालक भिका चाैधरी, सुभाष माेरे, हाेमगार्ड भूषण ठाकूर तैनात होते. त्यांनी माेटारसायकलवर (क्र.एमएच १८-एन २१४) ट्रिपल सीट येणाऱ्यांना थांबवले. त्यांच्याकडे लायसन्स, वाहनाच्या कागदपत्रांची विचारपूस केली. या वेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

त्यामुळे ही मोटारसायकल चाेरीची असल्याचे लक्षात अाले. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात अाणून त्यांची चाैकशी करण्यात आली. या वेळी माेटारसायकलवरील नरेश कांतिलाल यादव (गवळी) (२२, रा. नगावबारी चाैफुली, मारुती मंदिराजवळ देवपूर), सुनील रामू मरसाळे (२२, रा. प्रियदर्शनीनगर, नगावबारी खदानीजवळ, देवपूर), नरेश उर्फ मांग्या प्रकाश चव्हाण (१९, रा. प्रियदर्शनीनगर) यांच्यापैकी सुनील रामू मरसाळे हा पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे चाैकशीतून पुढे अाले. त्याने माेटारसायकल चाेरीची असल्याची कबुली दिली. त्याच्यावर यापूर्वी घरफाेडी, चाेरीचे गुन्हे दाखल असून, ते न्यायप्रविष्ट अाहेत. त्याच्याकडे करण्यात अालेल्या चाैकशीतून त्याच्यासाेबत अजून दाेन जण असल्याचे स्पष्ट झाले. त्यात लखन शकील खाटीक (रा. प्रियदर्शनी नगर, नगावबारी) अाणि एक अल्पवयीन अाराेपी अाहे. त्यांनी शहरालगत माेहाडी पाेलिस ठाणे येथे दाखल असलेल्या रस्तालूट, तालुका पाेलिस ठाण्यातील लुटीबाबतची कबुली दिली आहे. जप्त साहित्याची उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव, पाेलिस निरीक्षक प्रदीप पाटील आदींनी पाहणी केली. तिसऱ्यांदा पोलिसांनी गुन्हेगारांकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गुंडगिरीला अंकुश लावणार
^काेम्बिंग अाॅपरेशन राबवून अशा टाेळ्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पाेलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना वेळाेवेळी सूचना दिल्या अाहेत. त्यानंतरही नियमित स्वरूपात कारवाई सुरूच अाहे. गुन्हेगारी गुंडगिरीवर कडक कारवाई करून त्यांचा पाेलिस प्रशासनाकडून नायनाट केला जाईल. साहेबराव पाटील, जिल्हापाेलिस अधीक्षक

कट मारून लुटीची पद्धत...
पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या अाराेपींची लूट करण्याची एक विशिष्ट पद्धत अाहे. त्यात ते माेटारसायकलवरून रस्त्याने जाणाऱ्या अन्य माेटारसायकलवरील चालकास कट मारायचा. त्यानंतर कट का मारला अशी विचारणा करून त्यांच्याशी वाद घालायचा. त्यानंतर संबंधितांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून त्यांच्याकडील माैल्यवान वस्तू, पैसे हिसकावून माेटारसायकलची चावी प्लग काढून घेत त्या ठिकाणाहून पळ काढायचा. पोलिसांना हा नवीन प्रकारही उघडकीस आणला आला.

तिघांना अटक; एक फरार
या प्रकरणी तिघांना पाेलिसांनी अटक केली अाहे. त्यांच्याकडून चाेरीच्या दाेन माेटारसायकली (६० हजार), एक लॅपटाॅप (२५ हजार), विविध कंपन्यांचे नऊ माेबाइल (४०, ५०० रुपये) अाणि ७५ हजार रुपयांची एक साेन्याची २० ग्रॅम (दाेन ताेळे) वजनाची चेन, दाेन साेन्याच्या अंगठ्या प्रत्येकी ग्रॅम (१ ताेळे) असा एकूण लाख ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात अाला अाहे. या प्रकरणातील एक अाराेपी फरार अाहे. तर एक अल्पवयीन असल्याने त्याला चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात अाले अाहे.

पाेलिसांची कारवाई
{ धूमस्टाइल साेनसाखळी चाेरणाऱ्या टाेळीला अटक, गुन्ह्यातील लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
{ माेटारसायकल चाेरीच्या तपासासाठी नियुक्त विशेष पथकाकडून १२३ चाेरीच्या दुचाकी हस्तगत.
{ तवेरा गाडीत दराेड्याच्या तयारीत असलेल्या मालेगावच्या पाच सराईत गुन्हेगारांना गावठी
रिव्हाॅल्व्हरसह अटक.
{ शिरपूर पाेलिसांकडून गुन्ह्यासाठी अालेल्या दाेन जणांना गावठी पिस्तूलसह घेतले ताब्यात.
{ कृषी महाविद्यालय भागात दराेड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या पाच जणांना घेतले ताब्यात.
{ अारटीअाेच्या घरातून रिव्हाॅल्व्हर, राेख रकमेची चाेरी करणाऱ्यांचा शाेध.
बातम्या आणखी आहेत...