आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकित मालमत्तेची गुरुवारपासून जप्ती, महापालिकेची आक्रमक भूमिका; पथके तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिका प्रशासनाने वारंवार सूचना करूनही थकित कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर प्रशासनाने कारवाईची भूमिका घेतली आहे. तत्पूर्वी शेवटची संधी म्हणून थकित मालमत्ताधारकांना दि.१३ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही कराची रक्कम भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. तसे स्पष्ट संकेत महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
शहरातील विविध भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात कराची रक्कम थकित आहे. संबंधित नागरिकांना यापूर्वी सूचना तसेच नोटिसा देण्यात आल्या आहेत. शिवाय अजूनही नोटिसा दिल्या जात आहेत; परंतु यानंतरही थकित रक्कम भरण्यास बहुतांश नागरिक पुढे येत नाही. त्यामुळे अशा थकित मालमत्ता धारकांविरुद्ध ताठर भूमिका घेण्याचे महापालिका प्रशासनाने ठरविले आहे. त्याचाच भाग म्हणून थकित मालमत्ता धारकांना दि.१३ ऑक्टोबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतरही मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९चे कलम १२८, ते प्रकरण मधील कराधान नियम ४२ ते ४८ मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे थकित मालमत्ताधारकांनी कटू अनुभव टाळण्यासाठी वेळेत भरणा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. याबाबत संबंधित विभागाला तसे आदेश महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत.

लिलाव-िवक्रीतून वसुली
जप्तीचेआदेश काढून संबंधितांची जंगम अाणि स्थावर मालमत्ता जप्त करून जाहीर लिलाव-विक्रीतून कराची रक्कम वसूल केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...