आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकृतीचा पर्दाफाश, कारच्या काचा फोडणारे तिघे निघाले अभियांत्रिकीचे विद्यार्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मू. जे. महाविद्यालयाच्या परिसरात मे रोजी मध्यरात्री तीन टवाळखोरांनी आठ कारच्या काचा फोडल्या होत्या. त्यांचे हे कृत्य तीन ठिकाणांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यांच्या फुटेजचा आधार घेऊन नगरसेवक वाहनमालकांनी सोमवारी तिघा टवाळखोरांना शोधून काढले. हे तिघेही अभियांत्रिकीच्या डिप्लोमाचे विद्यार्थी आणि उच्चवर्गीय घरांतील आहेत. तिघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असता, पोलिसांनी समज देऊन सोडून दिले आहे.

शहरातील मू.जे.महाविद्यालय परिसरातील ओंकारेश्वरनगर, जयनगर, गुलमोहर कॉलनी अनंत हौसिंग सोसायटीत गेल्या बुधवारी रात्री २.३० वाजेदरम्यान अक्षय मनोज वाघ (वय २१, सर्वोत्तमनगर, सिंधी कॉलनी रोड), विशाल बबन वाधवानी (वय २०, सिंधी कॉलनी) अंकुश झवर (वय २१, मानराज पार्क) यांनी दारूच्या नशेत आठ कारच्या काचा फोडल्या होत्या. तत्पूर्वी तिघेही रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिले होते. त्यानंतर ते मोटारसायकलीने रेल्वे स्टेशन परिसरात नाश्ता करण्यासाठी गेले होते. पण, तेथे काहीच मिळाल्याने पुन्हा नवीन बसस्थानकावर आले होते.
मात्र, तेथेदेखील त्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा ओंकारेश्वरनगरकडे वळवला. या परिसरात त्यांनी एक-एक करत तब्बल आठ गाड्यांच्या काचा लाकडी दांड्याने फटके मारून फोडल्या होत्या. त्यांचे हे कृत्य जयनगरातील प्रकाश वाणी यांच्या दुकानाबाहेर, वसंतम् सुपर शॉप ओंकारेश्वर मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून जाणून घ्या कसा लागला तपास...