आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग, अध्यात्मातून १० हजार युवक नैराश्यमुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सध्याच्या स्पर्धेच्या युगात युवकांना अधिक सजग ज्ञानसंपन्न राहणे आवश्यक आहे. मात्र, अनेकजण मूळ उद्देशापासून भरकटतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नैराश्य येऊन ते व्यसन, आत्महत्यासारखे मार्ग निवडतात. अशा सुमारे १० हजार नैराश्यग्रस्त युवकांच्या आयुष्यात योग अध्यात्माच्या मार्गाने नवीन चैतन्य भरण्याचे काम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चिराग पाटील विनायक प्रभात या दोन युवकांनी केले आहे.
केस : सिंधीकॉलनी येथील एका युवतीची ही कहाणी आहे. तीन वर्षांपूर्वी ही युवती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तीचे वडील दारूच्या व्यसनात बुडाले होते. याचा थेट परिणाम तिच्या शिक्षणावर झाला. दररोज होणाऱ्या वादामुळे तिने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी पाटील प्रभात यांच्या संपर्कात आल्यानंतर तिने तीन दिवस शिबिरात घालवले. यात तिच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाला. वडिलांशी कसा संवाद साधावा, याचे मार्गदर्शन तिला मिळाले. त्यामुळे वडिलांनी दारू पिणे बंद केले.
केस : धानोरायेथील एक महाविद्यालयीन युवक २०१२ मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्द्युक्त झाला. तो त्यात इतका गुंतला की २५ लाख रुपयांचे त्याच्यावर कर्ज झाले. कर्जामुळे प्रचंड नैराश्यात असताना या विद्यार्थ्याने देखील शिबिरात प्रवेश घेऊन स्वत:मध्ये बदल केले. आता त्याचे शिक्षण पूर्ण झाले असून त्याचा शेअर मार्केटचा व्यवसायही व्यवस्थित सुरू आहे. शिवाय ताे शेतीदेखील करत आहे.

केस : धरणगावतालुक्यातील झुरखेडा येथील भूषण पाटील नावाच्या मुलाने शिबिरातून प्रेरणा घेत आपल्या गावात एक महत्त्वाचे काम केले. त्याच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई हाेती. त्याने गावकऱ्यांच्या मदतीने जलसंधारणाचे काम केले. यामुळे त्यांच्या गावात पाणी तर आलेच पण जमिनीतील पाण्याची पातळीदेखील वाढली अाहे.
बातम्या आणखी आहेत...