आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रडार जोडणीमुळे दोन दिवसांत कृत्रिम पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी राज्यात लवकरच कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेल्या रडार यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली आहे. मराठवाडा केंद्रस्थानी ठेवून औरंगाबाद हे स्थानक निश्चित करण्यात आले आहे. तेथून २५० किलोमीटरच्या क्षेत्रात पाऊस होईल. जळगाव जिल्ह्यालाही त्याचा लाभ होणार असून एक-दोन दिवसांत ही यंत्रणा कामाला प्रारंभ करणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अजिंठा विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर दोन महिने उलटूनही संपूर्ण राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. औरंगाबाद येथे रडार यंत्रणा उभारून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. रडार यंत्रणेच्या तांत्रिक बाबी पूर्ण होताच बाष्पयुक्त ढगांमधून पाऊस पाडला जाईल. औरंगाबाद विमानतळावरून ही यंत्रणा कार्य करेल. पावसाचा प्रयाेग करणाऱ्या तज्ज्ञांच्या चमूने गरज भासल्यास नांदेड, लातूर किंवा जळगाव विमानतळाचा पर्यायही हाती ठेवला असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

दुबारपेरणीसाठी मोफत बियाणे
पावसाअभावीयावर्षी पहिले पीक वाया गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. या दुबार पेरणीसाठी बियाणे महामंडळाकडून माेफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मका, सोयाबीन, नाॅनबिटी कापूस या पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेची यंत्रणा हे वाटप करेल. त्याशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी १हजार ५०० रुपये अनुदानही दिले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

रडारयंत्रणा देणार ढगांची माहिती
पाऊसपाडण्यासाठी बाष्पयुक्त ढगांची गरज असते. रडार यंत्रणा अशा बाष्पयुक्त ढगांची माहिती देईल. ही यंत्रणा अमेरिकेतून आणण्यात आली आहे. रडारच्या माध्यमातून ढगांची उंची, दिशा कळू शकणार आहे. यासाठी हवामान (मेट्रालाॅजिकल) विभागाचीही मदत घेतली जाईल. अमेरिकेच्या व्हेदर मॉडिफिकेशन या लिमिटेड संस्थेला कृत्रिम पाऊस पाडण्याचे काम देण्यात आले आहे. या प्रयोगात हवामानशास्त्र केंद्र, भारतीय प्रोद्योगिकी संस्था (चेन्नई), एमआर सॅट यासारख्या संस्थाही सहभागी आहेत.

असा होईल प्रयोग
प्रारंभीएअरक्राप्ट (िवमान)च्या माध्यमातून क्लाऊड शेडिंग करण्यात येईल. यामध्ये सोडियम क्लोराइड, एअरोसुल्स ही रसायने ढगांवर फवारली जातील. या यंत्रणेमार्फत ४०० किलोमीटरपर्यंत पाऊस पाडण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र २५० किलोमीटरपर्यंत प्रभावीपणे पाऊस पाडणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी औरंगाबादमध्ये शुक्रवारीच ‘सी बॅड डाॅपलर रडार’ बसविण्यात आले आहेत. काही शासकीय विभागांची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर दोन दिवसांत कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे.