आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिमिक्स गाणी, नृत्यावर तरुणाईची धमालमस्ती, विविध कलाप्रकार सादर करून लुटला आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धनाजीनाना चौधरी िवद्या प्रबाेधिनी संचालित कला, वाणिज्य, िवज्ञान महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन गुरुवारी दिवसभर चाललेल्या या संमेलनात िवद्यार्थ्यांनी विविध खेळ, नाटीका, रिमिक्स गाणी, नृत्यावर दिवसभर धमाल केली. तसेच परदेसी जाना नही, अाई भवानी, अाेरी चिरय्या, छाेटी सी अाशा, कव्वाली ढलता सुरज या गीतांचे गायन करण्यात अाले. विद्यार्थ्यांनी अनेक कलाप्रकार सादर करून अानंद लुटला.
या वेळी महाविद्यालयाचे माजी िवद्यार्थी मुक्ताईनगरचे तलाठी मिलिंद देवरे यांनी महाविद्यालयातर्फे मी राष्ट्रीय रायफल शूटरचा िवद्यार्थी हाेताे, यामुळे टक्के अारक्षण मिळाल्याने खेळाच्या अाधारे नाेकरीला लागलाे. शिक्षणामुळे मिळालेल्या अात्मविश्वासाने काेणत्याही नाेकरीचे अाव्हान पेलण्यास तयार हाेताे. त्यामुळे शिक्षण वेगळ्याच क्षेत्रात झाले असले तरी नाेकरीच्या संधी अाल्यास त्या घालवू नका, असे सांगितले.

संध्याकाळी बक्षीस िवतरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, सहायक क्रीडाधिकारी अशाेक चाैधरी, संस्थेचे सचिव डाॅ. पी.अार.चाैधरी, संचालक िवनय पाटील उपस्थित हाेते. या वेळी सुनंदा पाटील यांनी मुलांना खेळाचे महत्त्व सांगितले. खेळामुळे शारीरिक क्षमता वाढते, मन प्रसन्न हाेते अभ्यासात फायदा हाेताे असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक प्राचार्य अार.बी.वाघुळदे यांनी केले. यात वर्षभरातील विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

मायक्राेबायाेलाॅजी तृतीय वर्षाची िवद्यार्थिनी काेमल महाजन हिला उत्कृष्ट िवद्यार्थिनी म्हणून पुरस्कार देण्यात अाला. त्याचप्रमाणे नृत्य, गाणी, नाटक, िवडंबन नाट्य, फिश पाँड, फ्लाॅवर डेकाेरेशन, क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, मेंदी यासारख्या स्पर्धेतील िवजेत्यांना बक्षिसे देण्यात अाली. सूत्रसंचालन डाॅ. पी.अार.चाैधरी, प्रा. रेखा भाेळे यांनी तर समन्वयक माेहित अत्तरदे याने आभार मानले.

शेतकरी अात्महत्येवर प्रबाेधन
स्नेहसंमेलनातविद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या अात्महत्येमागील कारणे अभिनयाद्वारे सादर केले. तसेच शेतकरी अात्महत्या थांबायला हव्या, यावर प्रबाेधनही केले. "बेटी बचाओ बेटी पढाओ' विषयावर नाटक सादर झाले. तसेच माउली-माउली, काेळी नृत्य, बिहारी लाेकांचे अादिवासी नृत्य, मेरा जुता है जपानी, वेस्टर्न रिमिक्स गाण्यांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण समूह वैयक्तिक पद्धतीने िवद्यार्थ्यांनी केले.