आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअरमध्येही दुभंगलेला नकाशा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पुस्तकातील नकाशामधून अरुणाचल प्रदेश वगळल्याचे प्रकरण ताजे असतानाच शिक्षकांसाठी दिलेल्या एका सॉफ्टवेअरमधील नकाशातूनही काश्मीरचा काही भाग वगळण्याचा पराक्रम शिक्षण विभागाने केला आहे.

एकीकडे अखंड भारतासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत असताना महाराष्ट्र राज्याचा शिक्षण विभाग देशाच्या नकाशातून एकेक भाग गायब करत असल्याचे समोर येत आहे. पुस्तकांमधून अरुणाचल प्रदेश, काही बेटे, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग वगळण्याचा बेजबाबदारपणा संयोजकांनी केला होता. पण, आता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांना दिलेल्या ओपन टीचर सॉफ्टवेअरमधील टोपोग्राफी नेव्हिगेशनमधील भारताच्या नकाशातून काश्मीरचा काही भाग चीनमध्ये दाखवल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर होणार आहे. पण, पुस्तकात एक आणि सॉफ्टवेअरमध्ये दुसरा नकाशा असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकही संभ्रमात आहेत.