आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम बापूंवरील आरोपांचा निषेध, भुसावळात मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- आसाराम बापूंवर गेल्या चार वर्षांपासून निराधार आरोप करून त्यांचे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न माध्यमांतून केला जात आहे. आसाराम बापू यांचा शिष्य परिवार देशभरात मोठय़ा प्रमाणात आहे. तथ्यहीन आरोपांमुळे शिष्य परिवाराच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे माध्यमांनी प्रत्येक विषयाची खातरजमा केल्यानंतरच आसाराम बापूंवर आरोप करण्याचा विचार करावा, अशा आशयाचे निवेदन योग वेदांत सेवा समितीने येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिले आहे. तत्पूर्वी आसाराम बापूंच्या अनुयायींनी शहरातील सेंट अलॉयसिस स्कूलपासून बुधवारी दुपारी 12 वाजता मूकमोर्चा काढला. त्यात विभागातील जवळपास 400 शिष्य सहभागी झाले होते.

चिमुकल्यांचीही हजेरी
मूकमोर्चात योग वेदांत सेवा समितीचे पदाधिकारी, शिष्य परिवारासह चिमुकली बालकेही सहभागी झाली होती. मोर्चात ‘संत समाज बापूजी के साथ है’, ‘संतांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करावी’, ‘देशवासीयांनो, सावध व्हा’ असे घोषणा फलक होते.

मोर्चात यांचा सहभाग
योग वेदांत सेवा समितीने काढलेल्या मोर्चात सरस्वती मधाणी, दत्तू पाटील, निर्मल चंदनानी, सुभाष पाटील, दीपा रत्नानी, नरेश कटियार, पुष्पा चौधरी, लिलाबाई पाटील, सुनीता जाधव, ज्योती मराठे, सुरेश झामणानी, खुशाल मोरे, दिव्या रत्नानी, राजकुमारी झामणानी, नारायण रत्नानी, वर्षा आहुजा, राणी पंजवानी आदींचा समावेश होता.
0 विभागातील अनुयायी स्वयंप्रेरणेने झाले सहभागी
0 प्रांताधिकारी कार्यालयात दिले मुख्य मागण्यांचे निवेदन