आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर वीज प्रकल्पामुळे राखेचा पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून निघणारी फ्लाय अँश परिसरासाठी डोकेदुखी बनली आहे. साकरी, फेकरी, पिंप्रीसेकम आणि फुलगाव या गावांवर होणारा राखेचा वर्षाव आता आयुध निर्माणी वरणगावपर्यंत फैलावला आहे. ‘एफ’ ग्रेडचा निकृष्ट कोळसा वीजनिर्मितीसाठी वापरला जात असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून फ्लाय अँशचे लोट चिमणीतून बाहेर फेक ले जात आहेत. परिसरातील फेकरी, साकरी, जाडगाव, मन्यारखेडा, फुलगाव आणि वरणगाव आयुध निर्माणीवर राखेचा वर्षाव होत आहे. वीजनिर्मितीसाठी नियमानुसार ‘ए’ ग्रेडचा कोळसा वापरणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ 1900 कॅलरीजचा ‘एफ’ ग्रेड कोळसा वापरला जात आहे.

सर्वांत निकृष्ट कोळसा वापरल्यामुळे 51 टक्क्यांपेक्षा अधिक राख निघत असून ती चिमणी आणि हॉपर्समधून परिसरात उडत असल्याने गेल्या तीन दिवसांपासून गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. निकृष्ट कोळशामुळे प्रकल्पातील संचांवर परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे कर्मचार्‍यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.