आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोले यांची भाजपमध्ये मुस्कटदाबी; म्हणून खासदारकीचा राजीनामा- अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- राहुल गांधीचा धसका घेऊन पंतप्रधान मागील 50 दिवसांपासून गुजरातमध्ये ठाण मांडून बसले आहेत. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कर्जमाफीच्या घोषणा करून सहा महिने झालेत मात्र, अद्याप शेतकर्‍यांना एक रुपयाही मिळाला नाही. राज्यात फडवणीस नाही 'फसवणूक सरकार' आहे, अशा शब्दात अशोक चव्हाणा यांनी घणाघाती टीका केली.

 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, तळोदा या तीन पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी नंदुरबार शहरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे जाहीर सभा घेत आहेत.

 

नाना पटोले यांची भाजपमध्ये मुस्कटदाबी

नाना पटोलेयांची भाजपमध्ये मुस्कटदाबी होत होती. म्हणून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे अनेक खासदार नाराज असल्याचा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...