आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टविनायक पार्कमध्ये शिक्षकाच्या बंद घरातून १३ तोळे सोने लांबवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पिंप्राळ्यातीलअासावानगर परिसरातील अष्टविनायक पार्कमध्ये चाेरट्यांनी शुक्रवारी रात्री शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप ताेडून कपाटातील लाख ९३ हजार ३५० रुपयांचा एेवज लांबवला. यात १३ तोळे सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश आहेे. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दरम्यान, चाेरट्यांनी महामार्गाजवळ असलेले घर लक्ष्य करण्यास सुरुवात केली अाहे.

अष्टविनायक पार्कमधील गट क्रमांक १९२च्या प्लाॅट क्रमांक १६मधील श्रीकृष्ण बंगल्यात काशिनाथ पलाेड हायस्कूलचे शिक्षक उदय रवींद्र बडगुजर (वय ३१) हे राहतात. ते शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास पुणे येथील त्यांच्या भावाला भेटण्यासाठी कुटुंबासह गेले हाेते. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजाऱ्यांना कंपाउंडच्या बाहेर दाेन कुलूप फेकलेले अाढळून अाले, तर बडगुजर यांच्या घराच्या लाेखंडी दरवाजाची जाळी उचकटलेली अाणि दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे शेजाऱ्यांनी तत्काळ बडगुजर यांना फाेनवरून याबाबत माहिती दिली, तर बडगुजर यांनी त्यांचे नातेवाईक घनश्याम पंढरीनाथ बडगुजर यांना या घटनेची माहिती कळवली. त्यांनी रामानंदनगर पाेलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला अाहे. तपास उपनिरीक्षक राजेश घाेळवे करत अाहेत.
चाेरट्यांनी कपडे दुकान फाेडले
बळीरामपेठेत इंदरलाल मंगवाणी (रा. सिंधी काॅलनी) यांच्या मालकीचे मनाेज गारमेंट्स नावाचे कपड्यांचे हाेलसेलचे दुकान शुक्रवारी वर्सी महोत्सवानिमित्त दुपारी १.३० वाजता दुकान बंद केले. शनिवारी सकाळी दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. चाेरट्यांनी गल्ल्यातील रक्कम कपडे चाेरून नेले.

पाेलिसांची गस्तीत सुस्ती
शहरातवाढलेल्या घरफाेड्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी शहरातील सर्व पाेलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अाणि गुन्हे शाेध पथकांच्या घेतलेल्या बैठकीत गस्त वाढवण्याचे अादेश दिले हाेते. मात्र, काही कर्मचारी साेडले तर अनेक कर्मचाऱ्यांची गस्तीत सुस्ती अाली असल्याचे नित्य हाेणाऱ्या अशा घटनांमुळे दिसून येत अाहे. चाेरट्यांनी नेमकी हीच संधी साधत शहरात घरफाेड्यांची मालिका सुरूच ठेवली अाहे.

२ लाख ८८ हजारांचे दागिने लंपास
शिवकाॅलनी रेल्वे पुलाकडून पिंप्राळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दक्षिणेकडील रस्त्याच्या काठावर असलेल्या अष्टविनायक पार्कमधील प्लाॅट क्रमांक १६चे मालक उदय बडगुजर हे शुक्रवारी रात्री वाजता कुटुंबीयांसाेबत पुण्याला गेले. ही संधी साधत अज्ञात चाेरट्यांनी बंद घराचे दाेन्ही कुलूप ताेडून अात प्रवेश केला. त्यानंतर चाेरट्यांनी घरातील सर्व सामानाची झडती घेऊन ते अस्ताव्यस्त फेकले, तर लाेखंडी कपाटाचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी हजार ५०० रुपये राेख यासह लाख ८७ हजार ८५० रुपयांचे साेने-चांदीचे दागिने चाेरट्यांनी लंपास केले. यात १३ ताेळे साेने हजार ६०० रुपयांच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...