आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashuli Jain Participate In Harvard University's Conference

हार्वर्ड विद्यापीठातील परिषदेत आशुली जैनचा सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात हाेणाऱ्या (हार्वर्ड काॅन्फरन्स इन अाशिया प्राेग्राम) परिषदेत मुंबईच्या सेंट झेवियर काॅलेजची विद्यार्थिनी जळगाव येथील रहिवासी अाशुली जैन सहभाग घेणार अाहे. तिच्यासह सात विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करीत अाहेत.

जागतिकीकरणात समता, सहिष्णुता आणि स्वातंत्र्य यांचा सांस्कृतिक ध्येय धोरण, याबाबत आशियामध्ये काय परिणाम झाले? याबाबत हे विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. आपल्या अभ्यासातील काढलेले निष्कर्ष, त्यावरच्या उपाययोजनेबाबत ते चर्चा करणार आहेत. हे विद्यार्थी दाेन आठवडे हार्वर्ड कॅम्पसमध्ये असतील. त्यानंतर १२ ते २० मार्च २०१६ दरम्यान हार्वर्डचे विद्यार्थी मुंबईला याच विषयासंदर्भात कॉन्फरन्ससाठी येतील. त्या वेळी आशुली जैन त्यांना हा विषय समजावून सांगेल. अाशुली ही जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची नात, तर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांची कन्या अाहे.