आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashutosh News In Marathi, AAP, Eknath Khadse, BJP, Divya Marathi

कोणत्या व्यवसायातून खडसे झाले करोडपती?, आपच्या आशुतोष यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कोण आहेत हे खडसे, 30 वर्षांपूर्वी कुठे होते. कुठून आला इतका पैसा. असा कोणता व्यवसाय आहे की ते करोडपती झाले? असा सवाल आम आदमी पार्टीचे प्रवक्ता व ज्येष्ठ पत्रकार आशुतोष गुप्ता यांनी केला. सुभाष चौकात आयोजित जाहीर सभेत त्यांनी युपीए व एनडीएवर सडकून टीका केली.


आम आदमी पार्टीचे जळगाव व रावेरमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी पत्रकार गुप्ता बुधवारी जळगावात आले होते. यावेळी त्यांनी देशात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. 1 लाख 81 हजार कोटींच्या घोटाळ्यासमोर 64 कोटींचा बोफोर्स घोटाळा अत्यंत किरकोळ आहे. आता इतका कमी घोटाळा करण्यालाही लाज वाटत असेल. असे कित्येक घोटाळे असतील जे आपल्याला माहीतही नसतील असा टोला लगावला. 1977 नंतरच्या आंदोलनानंतर काँग्रेसला एकेक धक्के बसत गेले आणि आज काँग्रेस स्वत:च्या बळावर सरकार बनवू शकत नसल्याचे ते म्हणाले. लाखो रुपयांच्या कोळसा घोटाळ्याच्या पैशातून दिल्लीसारख्या किती शहरांचा विकास होऊ शकला असता असेही ते म्हणाले. त्यासाठी संसदेत इमानदार व्यक्ती पाठविणे गरजेचे असल्याचे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान झाल्यास एक वर्षात भ्रष्टाचार्‍यांना जेलमध्ये पाठवणारे नरेंद्र मोदी खोटारडे असल्याचे नमूद करत गुजरात सरकारमधील भ्रष्ट व शिक्षा झालेल्या मंत्र्यांना आजपर्यंत मंत्रिमंडळात का ठेवले असा सवालही त्यांनी केला. यावेळी प्रा.शेखर सोनाळकर यांनी सुरेश जैन, गुलाबराव देवकर, मनीष जैन, एकनाथ खडसे यांच्या नावाचा उल्लेख करीत आरोपांच्या फैरी झाडल्या. उमेदवार डॉ. संग्राम पाटील, राजीव शर्मा, तसेच गौतम निकम यांचेही भाषण झाले.


‘आप’चा रोड शो
आम आदमी पार्टीतर्फे बुधवारी सायंकाळी 7 वाजता रोड शो करण्यात आला. यावेळी आपचे प्रवक्ता व ज्येष्ठ पत्रकार आशुतोष गुप्ता यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. तत्पूर्वी एम.जे.कॉलेजपासून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करीत वातावरण निर्मिती करण्यात आली. काव्यर}ावली चौकापासून ‘रोड शो’ला सुरुवात झाली. शिरसोली नाका, इच्छादेवी चौक मार्गे रॅली सुभाष चौकाकडे आली.