आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia's Largest Solar Project Very Soon Open Ajit Pawar

आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन - अजित पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील महाकाय सौरऊर्जा प्रकल्पातून 125 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीमुळे माळमाथा भागाचा कायापालट झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे दिली.


अनेक अडथळ्यांनंतर सुरू झालेल्या शिवाजीनगर येथील प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तेथून वीजनिर्मितीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाची चाचणी सुरू होती. त्यानंतर आता हा प्रकल्प उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी पवार यांनी प्रकल्पस्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोणताही जाहीर कार्यक्रम न घेता पाहणी केल्यानंतर पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. या वेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, आमदार योगेश भोये, आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, महाजेनकोचे कार्यकारी संचालक अरविंदसिंग, प्रकल्प संचालक चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक व्ही. एस. पाटील, मुख्य अभियंता ए. जी. देवतारे, अधीक्षक अभियंता जे. पी. जारी उपस्थित होते.