आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात माहिती कार्यालयाच्या कर्मचार्‍यावर चाकूहल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उधार दिलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे जळगावातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात सोमवारी हाणामारी झाली. माहिती कार्यालयातील चालकाच्या मुलाने दुसर्‍या चालकावर चाकूने सात वार केले.

जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक अरुण इगनाती सोनवणे (वय 50) यांनी सहकारी चालक प्रकाश बारकू मोरेकर यांच्याकडून 30 हजार रुपये उधार घेतले होते. वारंवार मागणी करुनही सोनवणे यांनी पैसे परत केले नाहीत, त्यामुळे सोमवारी मोरेकर यांनी संतापून अरुण सोनवणे यांना पैशांबद्दल विचारणा केली. यावेळी मोरेकर यांचा मुलगा श्रीकांत हा देखील होता. सोनवणे व मोरेकर यांच्यात वाद सुरू असतानाच श्रीकांतने चाकू काढून सोनवणे यांच्यावर हल्ला केला. त्याने एकूण सहा वार केले. जखमी होऊन पडलेल्या सोनवणे यांना कार्यालयातील इतर कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.