आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशिदीचा हिशेब मागणाऱ्या तरुणास मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शाह अाैलिया मशिदीचा हिशेबाबाबत विचारणाऱ्या तरुणाला आठ ते दहा विश्वस्तांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री वाजेच्या सुमारास घडल्याचे जखमी तरुणाने सांगितले. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फुकटपुरा परिसरातील शाह औलिया मशिदीत रविवारी रात्री वाजता विश्वस्तांची बैठक सुरू होती. या बैठकीत शेख लुकमान शेख बब्बू (वय ३०) याने चर्चा सुरू असताना २० वर्षांपासूनच्या हिशेबाचा मुद्दा उपस्थित केला. संस्थेच्या दुकानांचे भाडे आणि इतर हिशेबाची विचारणा केल्यानंतर वादाला सुरवात झाली. काही वेळानंतर हिशेब विचारल्याचा राग अाल्याने शरीफ शहा, आरीफ शहा, तौफिक शहा, मुक्तार शहा आणि शाहिद शहा यांनी लोखंडी खुर्च्या, लाकडी दांडक्यांनी लुकमान याला बेदम मारहाण करून जखमी केले. जखमी अवस्थेतच लुकमान याने एमअायडीसी पाेलिस ठाणे गाठले. त्याची तक्रार दाखल करून घेत पाेलिसांनी जखमी लुकमानला तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी संस्थेच्या विश्वस्त मंडळींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
बातम्या आणखी आहेत...