आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम मनसे भाजपच्या वाटेवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका सहन केल्यावर खचलेल्या टीम मनसेने भाजपच्या तंबूत जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्रिपद मिळाल्यावर एकनाथ खडसे मंगळवारी प्रथमच जळगाव दौ-यावर आले होते. या वेळी विश्रामगृहावर मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्‍हे यांच्यासह मनसे नगरसेवकांनी हजेरी लावून खडसे यांचे आशीर्वाद घेतले. मनसे नगरसेवकांची ही भेट नव्या राजकीय बदलाची द्योतक आहे. विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड दिल्यानंतर पालिकेच्या सत्तेवरूनही जैन गटाला पायउतार करण्याच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिका निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था असताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मनसे राष्ट्रवादी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असल्याने हे तिघे पक्ष एकत्र येऊ शकले नव्हते. आता निवडणूक आटोपली असून राजकीय समीकरणेही बदलली आहेत. निवडणुकीतील पराभवामुळे खचलेल्या मनसेने वेगळा मार्ग निवडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महसूल मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात आलेल्या एकनाथ खडसे यांच्या आशीर्वादासाठी मनसेच्या शहरातील संपूर्ण टीमने विश्रामगृह गाठले होते. या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी खडसेंचे आशिर्वाद घेतले. या वेळी त्यांच्या मातोश्री सिंधू कोल्हे, नगरसेवक मिलिंद सोनवणे, पद्मा साेनवणे, पार्वता भील, नितीन नन्नवरे, मंगला चौधरी अनंत जोशी हे मनसेचे नगरसेवकही उपस्थित होते.