आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तदान वाढीसाठी मतदारांच्या घरी पत्र, 11 पर्यंत लाख मतदारांना ‘व्‍होटर्स स्लीप’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहर मतदारसंघासाठी लागणारे मतदान यंत्र सील करण्याच्या कामाला मंगळवारी सकाळी वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात सुरुवात झाली. हे काम बुधवारपर्यंत सुरू राहील. तसेच शहर विधानसभा मतदारसंघातील सुमारे लाख मतदारांना व्‍होटर्स स्लीप वाटपाचे काम मंगळवारपासून सुरू झाले.
421 कंट्रोल युनिटचे सीलिंग सुरू
उपविभागीयअधिकारी अभिजित भांडे पाटील आणि तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत 110 कर्मचारी यंत्र सील करण्यासाठी काम करीत आहे. यात 421 कंट्रोल युनिट आणि 842 बॅलेट युनिट सील करण्याचे काम बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे.
शहर विधानसभा मतदारसंघासाठी 382 केंद्रस्तरीय अधिका-यांची नेमणूक केली आहे. ते प्रत्येकी 700 ते 1200 चिठ्ठ्या वाटपाचे काम 11 आक्‍टोंबरचा आरोप करणार आहेत. 12 आक्‍टोंबरला प्रत्येक केंद्रस्तरीय अधिकारी केंद्रांवर चिठ्ठ्या वितरित करणार आहेत.

मतदानवाढीसाठी शक्कल
प्रत्येकमतदाराने आपला हक्क बजवावा, यासाठी जिल्हा निवडणूक अधिका-यांनी एक शक्कल लढवली आहे. यासाठी प्रत्येक मतदाराच्या घरी पत्र पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पत्रांच्या वितरणाची जबाबदारी पालिकेच्या उपायुक्तांकडे सोपवली आहे. नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी मतदान यंत्र सील करताना कर्मचारी, अधिकारी