आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने उठवली भाजपविरोधात राळ, तातडीच्या बैठकीत भुसावळची जागा सोडण्यास केला विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- माजी पालकमंत्री संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने भुसावळची सेनेची जागा भाजपला सुटेल, अशा वावड्या उठत आहेत. याबाबत मंगळवारी शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक बियाणी चेंबर्समध्ये झाली. या बैठकीत कोणत्याही स्थितीत सेनेची जागा भाजपसाठी सोडू नये, म्हणून शिवसैनिकांनी विरोधाची राळ उठवली. शिवसैनिकांच्या या भावना मातोश्रीपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा, माजी आमदार दिलीप भोळे, उप जिल्हाप्रमुख सुकदेवराव निकम, तालुकाप्रमुख रमाकांत महाजन, माजी तालुका उपप्रमुख मनोज बियाणी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील, गटनेते किरण कोलते, नगरसेवक प्रकाश बतरा, प्रा.दिनेश राठी, विधानसभा क्षेत्रप्रमुख विलास मुळे आदी उपस्थित होते. भुसावळ विधानसभा मतदारसंघाची जागा १९६२पासून जनसंघ लढवत होता. यानंतर भाजपला या जागेवर विजय मिळवता आला नाही. यामुळे १९९५मध्ये युतीनंतर ही जागा शिवसेनेने, तर जामनेरची जागा भाजपने लढवावी, असा निर्णय झाला. या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही जागा युतीला मिळाल्या, अशी महत्त्वपूर्ण माहिती माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांनी दिली.