आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

जळगाव जिल्ह्यात बहुरंगी लढती, घोषणा अन‌् मिरवणुकांनी उमेदवारीचे घट बसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव शहर : शहरातलढत पंचरंगी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतर्फे मनोज चौधरी, विनोद देशमुख इच्छुक आहेत. कॉग्रेसचे डॉ.राधेश्याम चौधरी, अ‍ॅड.सलीम पटेल यांची नावे पुढे आली. मनसेचे ललित कोल्हे भाजपचे सुरेश भोळे रिंगणात असल्याने आमदार सुरेश जैन यांचा मार्ग खडतर आहे.

जळगावग्रामीण : शिवसेनेचेउपनेते गुलाबराव पाटील, कॉंग्रेसचे डी.जी.पाटील, भाजपचे पी.सी.पाटील हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर, संजय पवार, पुष्पा महाजन यांच्यात स्पर्धा आहे.
एरंडोल-पारोळा: आमदारचिमणराव पाटील आणि राष्ट्रवादीेच सतीश पाटील यांच्यात थेट लढत या वेळी िदसणार नाही. तेथे मनसेचे नरेंद्र पाटील आणि भाजपचे मच्छिंद्र पाटील, खासदार ए.टी.पाटील यांच्या पत्नी हेमलता पाटील इच्छुक आहेत. कॉंग्रेसकडून माजी आमदार पारूताई वाघ यांचे चिरंजीव डॉ.प्रवीण वाघ, विजय महाजन यांच्यापैकी एक जण उमेदवार असेल. त्यामुळे एरंडोलची लढत बहुरंगी होईल. पाचोरा: शिवसेनेतर्फेकिशोर पाटील, राष्ट्रवादीतर्फे आमदार दिलीप वाघ, प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांच्यापैकी एक जण िरंगणात असेल. मनसेचे डी. एम. पाटील, कॉंग्रे सचे प्रदीप पवार, भाजपतर्फे उत्तम महाजन हे रिं गणात असल्याने बहुरंगी लढत होईल.
चाळीसगाव: भाजपमधूनउन्मेश पाटील, कैलास सूर्यवंशी, रवींद्र पाटील, वाडीलाल राठोड हे राष्ट्रवादीकडून आमदार राजीव देशमुख, शिवसेनेतर्फे महेंद्रसिंग पाटील आणि रमेश गुंजाळ हे इच्छुक आहेत. कॉंग्रेसकडून अशोक खलाणे, धीरज येवले, मनसेतर्फे राकेश जाधव हे इच्छुक आहेत.
चोपडा: आमदारजगदीश वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा वैयक्तिक गट आणि शिवसेनेची मते ते घेतील. शिवसेनेतर्फे प्रा.चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीतर्फे माधुरी पाटील यांना उमेदवारी दिल्यास डॉ.चंद्रकांत बारेला कॉंग्रेसकडून रिंगणात उतरू शकतात. मनसेतर्फे इतबार तडवी रिंगणात आहेत.
भुसावळ: संजयसावकारे भाजपचे उमेदवार असतील. शिवसेनेकडून राजेश झाल्टे, संजय ब्राम्हणे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित नाही. कॉंग्रेसचे अस्तित्व नसल्याने अडचण आहे. त्यामुळे येथे सुद्धा रंगतदार लढत होईल.
मुक्ताईनगर: एकनाथ खडसेंविरोधात राष्ट्रवादीकडून रवींद्र पाटील, रेखा चौधरी, विनोदतराळ यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेचे चंद्रकांत पाटील रिंगणात उतरतील. कॉंग्रेस, मनसेकडून देखील उमेदवार उतरवले जाऊ शकतात. प्रमुख पक्षांनी समक्ष उमेदवार दिल्यास भाजपलादेखील ताकद लावावी लागेल.
यांनी भरले अर्ज
घटस्थापनेचा मुहूर्त साधण्यासाठी गुरुवारी जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर मतदारसंघातून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, नंदुरबार मतदारसंघातून डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांनी अर्ज दाखल केले. अघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा विषय रखडलेला असला तरी मुहूर्त साधण्यासाठी लढण्याची तयारी असलेल्या प्रत्येक इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी धावपळ दिसत होती. अर्ज भरण्यापूर्वी अनेकांनी जाहीर सभा घेतल्या. तसेच जोरदार शक्तिप्रदर्शन करत गगनभेदी घोषणा देत दणदणीत मिरवणुका काढल्या होत्या.

साधेपणाने दाखल केला कृषिभूषणांनी अर्ज
अमळनेरयेथे आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन करता साधेपणाने राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. या वेळी प्रदेश सदस्या तिलोत्तमा पाटील, पंडित चौधरी, महेंद्र बोरसे, मुख्तार खाटीक, सुरेश पाटील, बाळू पाटील या निवडक कार्यकर्ते उपस्थित हाेते. संजय पुनाजी पाटील यांनी राष्ट्रवादीकडून तर संदीप युवराज पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपतर्फे अनिल पाटील हे शुक्रवारी अर्ज दाखल करतील.
चौधरींचा प्रतीत अर्ज
रावेरआमदारशिरीष चौधरी यांनी गुरुवारी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर यांनी अर्ज स्वीकारला. या वेळी राष्ट्रवादीतील नाराजांचा एक गट त्यांच्यासोबत नव्हता. दुसरीकडे अनेक नाराज नेतेही त्यांच्यासोबत दिसल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या हाेत्या. आमदार चौधरी यांनी दोन प्रतीत आपला अर्ज दाखल केला. मात्र, त्यांनी एबी फॉर्म सोबत जोडला नाही. तसेच आमदारांच्या सौभाग्यवती तथा साकेगाव (ता.भुसावळ) येथील चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या अरुणा चौधरी यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. संस्थेच्या कागदपत्रात फेरफार करणे, पैशांची अफरातफरप्रकरणी आमदार चौधरी यांच्यावर २००७ मध्ये दाखल असलेल्या खटल्याचा अर्जात उल्लेख आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले माजी आमदार रमेश चौधरी, शरद महाजन, ज्ञानेश्वर महाजन चौधरींसोबत उपस्थित होते.
‘त्या’ बॅनरमुळे राष्ट्रवादीत खळबळ
पाचोरापाचोऱ्यातउमेदवारीवरून राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आमदार दिलीप वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर सभा घेतली. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप सोनवणे यांनी हजेरी लावली. त्या अर्थी त्यांची उमेदवारी पक्षातर्फे जाहीर झाल्याच्या वावड्या उठल्या. डॉ.अस्मिता पाटील यांच्या समर्थकांनी कोणतीही संधी दडवता चौकात बॅनर लावून लक्ष वेधून घेतले. बॅनरवर खासदार सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र असून ‘मी २७ सप्टेंबरला येतेय’ असा उल्लेख आहे. सुळे पाचोऱ्यात येताय का? अशी चर्चा सुरू झाल्याने तिकडे अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली होती.
चाळीसगावात भाजपची तीनच नावे
चाळीसगावमतदारसंघात१६ इच्छुक होते. परंतु शेवटच्या टप्प्यात भाजपचे कैलास सूर्यवंशी, उन्मेष पाटील रवींद्र चुडामण पाटील या तीनच नावांची चर्चा होतेय. यात सूर्यवंशी यांनी घटस्थापनेला पक्षाच्या एबी फॉर्मविना अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत राजेंद्र राठोडही होते. राठोड यांचे वडील वाडीलाल राठोड यांनीदेखील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. उन्मेश पाटील समर्थकांनी एकनाथ खडसे यांची जळगावात दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन गळ घातली. खडसेंनी त्यांना सर्वे रिपोर्टच्या आधारावर दिल्लीतील वरिष्ठ अंतिम निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादी मात्र ‘नो टेन्शन’ आहे. आमदार राजीव देशमुख यांना प्रतिस्पर्धी उमेदवार नाही. जोरदार शक्तिप्रदर्शन करून त्यांनी अर्ज दाखल केला.
खडसेंनी काढली रॅली
मुक्ताईनगरविधानसभेचेविरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी मंदा खडसे, निवृत्ती पाटील, अनिल खंडेलवाल, अॅड.संजय राणे त्यांच्यासोबत होते. तत्पूर्वी शहरातील भाजप कार्यालयापासून ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. नंतर खडसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विरोधकांच्या आमिषाला बळी पडता उत्तर महाराष्ट्रातील सर्व ११ जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची साथ महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदासाठी आपली दावेदारीही त्यांनी स्पष्ट केली. खासदार रक्षा खडसे, खासदार ए. टी. पाटील, आमदार गुरुमुख जगवानी, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, मोहम्मद हुसेन, अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, रमेश ढोले, अशोक कांडेलकर, संजय माळी उपस्थित होते. खडसे यांच्या रॅली, सभेच्या ठिकाणी एकही शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता हजर नव्हता.