आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला प्रचारकांची चांदी, बहुरंगी लढतीमुळे वाढले प्रचारकांचे दर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रचारासाठी निघार-या नेत्यांमागे किती गर्दी आहे, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे शहरात प्रचार करताना शक्तिप्रदर्शन करण्यासाठी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची महिला प्रचारक मिळवण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहेत. मागणी वाढल्याने हातात झेंडे घेऊन प्रचार रॅलीत सहभागी होणाऱ्यांचे दर ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. प्रचार रॅलीकरीता शनिवारपासूनच १२ दिवसांसाठी नावे नोंदवली जात आहेत.
ऐतिहासिक ठरणाऱ्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंचरंगी लढती होणार आहेत. या लढतींसाठी निघणा-या प्रचार रॅलींत कुणाच्या मागे मोठा जनसमुदाय आहे? यावर बरीच गणिते अवलंबून असतात. त्यामुळे जळगावकरांचे लक्ष वेधण्यासाठी हात मोकळा करण्याची तयारी इच्छुकांनी ठेवली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही उमेदवारांनी शनिवारी सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. काहींनी रविवारी प्रचाराचा मुहूर्त काढला आहे. त्यामुळे शनिवारी प्रचार रॅलीत महिला प्रचारकांची गर्दी जमा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. दिवाळीपर्यंत कापूस वेचणी नसल्याने घरी बसलेल्या शेतमजूर महिलांना त्यामुळे पर्यायी रोजगाराचे साधन उपलब्ध. एकआयडीसीत चटई इतर उद्योगात १०० ते १५० रुपये रोजंदारीने काम करणा-या महिलांना प्रचारात गेल्याने रोखीने २५० ते ३०० रुपये मिळणार असल्याने त्या महिलाही शेवटचे आठ दिवस प्रचाराकडे वळण्याची शक्यता आहे.
प्रचाराचे पॅकेज
वर्षभरापूर्वीसप्टेंबर २०१३मध्ये महापालिकेची तिसरी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत प्रचार प्रभाग हद्दीपुरता मर्यादीत होता. चार ते पाच तास प्रचारात सहभागी होणा-यांना १०० ते १५० रुपयांपर्यंत रक्कम दिली जात होती. विधानसभेसाठी मात्र प्रचारकांच्या मागणीत झालेली वाढ आणि प्रचार रॅलीचे अंतरही जास्त राहणार आहे. सकाळी ते १२ दुपारी ते सायंकाळी ५.३० पर्यंत २५० रुपये आणि दोन वेळच्या चहाची सोय करण्यात येत आहे. काही इच्छुकांनी तर ३०० रुपये देण्याचीही तयारी दर्शवली आहे.
१० दिवसांत १० कोटींचे अर्थचक्र
शहरातीलप्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी दर दिवसाला सरासरी किमान ७०० प्रचारकांना ३०० रुपयांप्रमाणे रक्कम दिल्यास प्रत्येकी १० दिवसांत २१ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. पाच उमेदवारांनी याप्रमाणेच खर्चाचे नियोजन केल्यास केवळ १० दिवसांत किमान १० कोटींची उलाढाल प्रचारकांच्या माध्यमातून शहरात होणार आहे.
निवडणुकीत हात मोकळा
कोणीनाराज होऊ नये, याची काळजी उमेदवारांकडून अधिक घेतली जाते. याचाच फायदा कार्यकर्ते घेत असतात. ऐनवेळी कार्यकर्ते हात मोकळा करण्याच्या सूचना करतात. यातून होणा-या खर्चाला प्रशासन कसा आळा घालते हा मुद्दा ठरणार आहे.