आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक प्रचारात येणार गल्ली ते दिल्लीपर्यंतचे मुद्दे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या 30 वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच भाजप शिवसेना एकमेकांच्या विरोधात आहे. 15 वर्षे सत्तेत असलेल्या आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसने दंड थोपाटले आहेत. 10 वर्षांपूर्वी राजकारण सुरू केलेल्या मनसेही ताकद आजमावून घेत आहे.
त्यामुळे यंदाची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलीच रंगतदार होईल, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. यात कोण कोणत्या विषयांना हात घालून शब्दांचे बाण मारतात विरोधकांना घायाळ करतात, यावर आता खल सुरू झाला आहे.
कॉग्रेसराष्ट्रवादी काय करू शकते
15 वर्षांपासूनसत्तेत असलेल्या कॉंग्रेस- राष्ट्रवादीकडे राज्यात केलेल्या विकासकामांशिवाय विरोधकांकडे बोट दाखवण्याचे फारसे मुद्दे हाती नाहीत. असे असले तरी चार महिन्यांपूर्वी केंद्रात एकहाती सत्ता मिळवलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारकडून अपेक्षा भंग झाल्याचा ठपका ठेवून पुन्हा मतांचा जोगवा मागितला जाणार आहे. यातही मतदारांना आकर्षित करता आल्यास या दोन्ही पक्षांकडून हिंदुत्वाचा मुद्दा मांडून अल्पसंख्याक मताना ओढण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
भाजप- शिवसेनेचे काय
स्वतंत्रझालेले भाजप शिवसेना निवडणुकीत महागाई, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर आगपाखड करू शकते. या व्यतिरिक्त विकासाचा अनुशेष तसेच अपूर्ण कामांचा मुद्दा उपस्थित करून शेतक-यांना भावनिक साद घालू शकतात. या निवडणुकीत केंद्रातील सरकारच्या कामाची तुलना करत राज्याच्या विकासासाठी मोदींचे भांडवल करण्यावर भाजप भर देण्याची शक्यता अधिक आहे. राज्यातील भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे सादर करून मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेकडून होऊ शकतो.