आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

निवडणूक नवी, जाहीरनाम्यात मात्र विषय,आश्वासने जुनीच, शेवटच्या टप्प्यात प्रचाराची धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी थांबणार आहे. खान्देशातील 20 जागांसाठी तब्बल 222 उमेदवार रिंगणात असून प्रचाराच्या अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांच्या दारी पोहोचण्याचा मानस उमेदवार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात जनसंपर्कावर प्रचंड भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी सुटी असल्याने प्रत्येक उमेदवाराने जास्तीत जास्त मतदारांची भेट घेतली.
युती आघाडी तुटल्यानंतर सर्वत्र राजकीय पक्षांनी सत्ता काबीज करण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. त्यामुळे खान्देशातील सर्वच मतदार संघात चौरंगी पंचरंगी लढती पाहायला मिळत आहेत. 20 मतदारसंघातील 222 उमेदवार, त्यांचे समर्थक यंत्रणा गावोगावी पोहचल्या आहेत. अनेकांच्या प्रचाराच्या दोन ते तीन फेऱ्यादेखील पूर्ण झाल्या आहेत. परंतु गेली अनेक वर्षे आपल्यासोबत असलेली मंडळी आज विरोधात असल्याने मतदारच काय पण उमेदवारांनादेखील विजयाची गणिते मांडताना अडचणी येत आहेत. अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळत असताना ‘कन्फ्युज’ झालेल्या मतदाराला शेवटच्या क्षणापर्यंत आपलेसे करण्यासाठी उमेदवार त्यांचे शिलेदार प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळत आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष भेटी, सोशल मीडिया, थेट फोनवरून संपर्क असे एेक ना अनेक फंडे अवलंबले जात आहेत. आता या प्रचाराचा शेवट जवळ आला असून खान्देशातील २२२ उमेदवारांना सोमवारी सायंकाळी वाजेनंतर प्रत्यक्ष भेटी बंद कराव्या लागणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत प्रचारात जीव ओतण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जाहीरनाम्यात काय आहेत मुद्दे?
शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी, मनसे काँग्रेस समाजवादी पक्ष या प्रमुख राजकीय पक्षांव्यतिरिक्त अपक्ष उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने जाहीरनामे तयार केले आहेत. पत्रकांच्या माध्यमातून निवडूण आल्‍यास कोणती विकासकामे केली जातील, याची यादीच दिली आहेत. यात प्रामुख्याने रस्ते, पिण्याचे पाणी चांगले आरोग्‍य यावर अधिक भर दिलेला दिसतो. त्यानंतर प्राधान्य शहरातील भुयारी गटारी, समांतर रस्ता, उड्डाणपूल या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या याेजनांचा समावेश केला आहे.

उदासीनताठरू शकते त्रासदायक
सध्यानिवडणुकीकडे बघण्याचा मतदारांचा दृष्टिकोन बदलायला लागला आहे. जागृती वाढत असताना रोकठोक भूमिकाही व्यक्त होताय. राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार यांना आता पूर्वी इतके महत्त्व दिल्याचे पाहायला मिळत नाही. उमेदवारांचे समर्थक हितचिंतक हे अपवाद ठरू शकतात. विकासकामांच्या मुद्द्यावर केवळ उणे-दुणे काढण्यापेक्षा सत्ताधारी विरोधक हे कधीही एकत्र आलेले पाहायला मिळत नसल्याचे आतापर्यंतच्या वाटचालीवरून पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होताय. मतदारांमधील ही उदासीनता उमेदवारांच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरू शकते.