आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...अन‌् शिवसेना, भाजप, मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आले एकत्र!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यात आघाडीत बिघाडी, तर महायुतीत फाटाफूट झाल्यानंतर सर्वत्र चौरंगी पंचरंगी लढती रंगणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आरोप- प्रत्‍यारोपाच्‍या फैरी झडताना पाहायला मिळणार आहेत. मात्र, या लढाईची गोड सुरुवात शुक्रवारी तहसील कार्यालयात पाहायला मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार एकत्र आल्याने बहुतांश जणांनी हस्तांदोलन करत कोणतीही कटुता पाळता गळाभेट घेतली.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्‍लक असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी होणार हे निश्चित होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तयारी केली होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश जैन यांचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे पुत्र राजेश जैन, रमेश जैन, नितीन लढ्ढा, करीम सालार सुनील महाजन यांच्यासह शेकडो शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करत तहसील कार्यालयात पोहोचले.
त्यापाठोपाठ भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांच्यासोबत आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, अशो लाडवंजारी, अमित भाटिया आदी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीकडून इच्छुक मनोज दयाराम चौधरी हे काही मोजक्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आले, तर चित्रा चोकापासून रॅलीच्या माध्यमातून मनसेचे उमेदवार ललित कोल्‍हे दाखल झाले. या वेळी सर्वच पक्षांचे उमेदवार तासभर एकाच ठिकाणी जमल्याने प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, एका वेळी एकच उमेदवार आता सोडला जात असल्याने इतरांना ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारावी लागली.
एकीचेबळ काही औरच : शिवसेना,भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते युती दुभंगल्यानंतर प्रथमच एकत्र आलेले पाहायला मिळाले. या वेळी अनेकांनी एकमेकांकडे बघत हस्तांदोलन केले, तर अनेकांनी उद्भवलेली परिस्थिती दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
निवडणुकीचामाहौल : युतीआघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने आतापर्यंत कुठेही निवडणुकीचे वातावरण तयार झालेले नव्हते. मात्र, युती आघाडी तुटल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाजत-गाजत आलेल्या उमेदवारांमुळे शुक्रवारी शहरात ‘इलेक्शन माहौल' तयार झालेला दिसला.

अख्ख्या जैन कुटुंबीयांची हजेरी
राजकीयजीवनातील ३० वर्षांच्या कालखंडात अामदार सुरेश जैन हे यंदा स्वत निवडणूक लढत असताना पहिल्यांदाच अर्ज दाखल करण्यासाठी हजर राहू शकले नाहीत. घरकुल प्रकरणात कारागृहात असल्याने त्यांच्याएेवजी त्यांचे पुत्र राजेश जैन, बंधू रमेश जैन पत्नी रत्ना जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपने केले राष्ट्रवादीला ओव्हरटेक
शिवसेनेपाठोपाठ अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबले होते. त्यांच्यानंतर आलेले भाजपचे कार्यकर्ते पाेलिस यांच्यात आत जाण्यावरून वाद झाला. यादरम्यान आधीच नंबर लावलेले राष्ट्रवादीचे उमेदवार पदाधिकाऱ्यांना अाेव्हरटेक करत भाजपचे पदाधिकारी सरळ तहसील कार्यालयात घुसले. या वेळी ‘आहो, आमचा नंबर आहे, तुम्ही कुठे जाताय?’ असे म्हणत त्यांना टोकले. याप्रसंगी भाजप राष्ट्रवादीची युती असल्याची मिश्कील टीकाही झाली.
भाजप कार्यालयासमोर शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते घोषणा देत नाचत असताना अचानक भाजयुमो पदाधिकाऱ्याला झेंड्याच्या काठीचा धक्का लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केल्याने तणाव वाढला होता. हे लक्षात येताच शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र पाटील कुलभूषण पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अमित भाटिया यांनी मध्यस्ती करत वाद मिटवला.