आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक प्रचारात भंगाळे कुटुंबीयांसमोर नात्यागोत्यांचा गुंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावशहराच्या राजकीय क्षेत्रात सर्वच पक्षांशी संबंध असलेल्या भंगाळे कुटुंबीयांपुढे पुन्हा एकदा राजकीय पेच निर्माण झाला आहे. सुरेश भोळे भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात उतरल्याने त्यांच्यासाठी धावून जाताना भंगाळे कुटुंब परिवारातील इतरांच्या पायात राजकीय पक्षांच्या बेड्या अडकल्याने उघडपणे फिरता येत नसल्याची स्थिती आहे.
यापूर्वीही ब-याचदा भंगाळे कुटुंबावर राजकीय द्विधा मन:स्थिती ओढवलेली आहे. या वेळीही ते अशाच परिस्थितीत अडकल्यामुळे राजकीय भवितव्य आणि नात्यागोत्यांची जपणूक यांचा गुंता कसा सोडवावा? हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कोण काय भूमिका घेता, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शहरात हॉटेल आणि वैद्यकीय क्षेत्रात जम बसवलेल्या भंगाळे कुटुंबातील सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या सर्वच पक्षात विखुरलेले आहेत. विविध संस्था, संघटनांवरही त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे विविध निवडणुकांना त्यांना समोरे जावेच लागते. अशावेळी पक्ष म्हणून आपल्याच कुटुंबातील सदस्यांसमोर आव्हान निर्माण करणे, विरोधात काम करणे हे टाळण्याचा प्रयत्न करता येत असला तरी त्यांना थेट उघडपणे मदत करता येत नाही. यापूर्वी लोकसभा पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणुकीत निर्माण झालेला पेच आताही निर्माण झाला आहे.
भागवतभंगाळे यांचेज्येष्ठ बंधू डॉ.अर्जुन भंगाळे काँग्रेसचे महानगराध्यक्ष आहेत. त्यांना आपल्या धाकट्या भावाचे शालक सुरेश भाेळे यांच्याविराेधात काँग्रेसचे उमेदवार डॉ.राधेश्याम चौधरी यांचा प्रचार करावा लागणार आहे.

आमदारसुरेश जैन यांच्याखान्देश विकास आघाडीचे नगरसेवक असलेले विष्णू भंगाळे हे सुरेश भोळा यांचे भाचे असले तरी त्यांना आमदार जैन यांचा प्रचार करावा लागणार आहे.त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. विष्णूभंगाळे यांच्यापत्नी संगीता भंगाळे या जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत. त्या आमदार सुरेश जैन यांच्या पॅनलमधून निवडून आल्या आहेत. राजकीय पेचात यापूर्वी भंगाळे कुटुंबीयांनी घेतलेली भूमिका
लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे हरिभाऊ जावळे यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे डॉ. अर्जुन भंगाळे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्षपदी असलेल्या सुरेश भोळे यांनी आपल्या बहिणीचे मोठे दीर भंगाळे यांचा प्रचार केला होता. त्यामुळे पक्षाने कारवाईही केली होती. राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले भागवत भंगाळे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराऐवजी खान्देश विकास आघाडीचे उमेदवार आणि पुतणे विष्णू भंगाळे यांच्या प्रचारासाठी उघडपणे फिरले होते. या वेळीही तोच पेच निर्माण होऊ नये, म्हणून भागवत भंगाळे यांनी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीसपदाचा राजीनामा देऊन राजकीय बंधनातून मुक्तता करून घेतली.