आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवड्याभरात स्वीकारले भिन्न विचारसरणीचे पक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीत बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना थेट उमेदवारी देणार नसल्याच्या घोषणा देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी ऐनवेळी दुस-या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली. स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे ऐनवेळी पक्ष बदलून उमेदवारी पदरात पाडून घेण्याच्या स्पर्धेत जळगावातील राजकारणीदेखील आघाडीवर होते. वर्षानुवर्षे पक्षात राहूनदेखील आपल्या पक्षाचा कोणत्या मतदारसंघात होण उमेदवार आहे? याबाबत अनेक राजकीय पदाधिकारी शनिवारी सायंकाळपर्यंत अनभिज्ञ होते. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर कोण कोणत्‍या पक्षात आणि कोण उमेदवार राहील, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बहुतांश ठिकाणी उमेदवार निश्चित नव्हते. अनेक ठिकाणी पक्षांमध्ये देखील उमेदवारी काेणाला दिली, याबाबत गोंधळ आहे. जामनेरमध्ये कॉंग्रेसचा आणि चोपड्यात भाजपचा दिलेला उमेदवार बदलण्याची प्रक्रिया मुदत संपेपर्यंत सुरू होती. चाळीसगावमध्ये उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली हे जळगावातील भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना शनिवारी सायंकाळपर्यंत माहित नव्हते. त्यामुळे राजकीय वतुर्ळात प्रथम गोंधळ निर्माण झाला होता.
कार्यकर्त्यांपुढेपडला मोठा पेच
उमेदवारीदाखल करणे निश्चित असले तरी काेणत्या पक्षाकडून हे निश्चित नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी आधीच्या पक्षाचे झेंडे आणि रुमाल गुंडाळून ठेवत नव्या पक्षाचे साहित्य काढताना कार्यकर्त्यांना कसरत करावी लागली. भुसावळात पालकमंत्री समर्थकांनी राष्ट्रवादीचे झेंडे फेकून भाजपचा रूमाल गळ्यात टाकला. तर शिवसेनेतील झाल्टे समर्थकांनी गतवेळेचा भगवा टाकून घड्याळाच्या टोप्‍या घातल्या. जामनेरमध्ये देखील डी. के. पाटील समर्थकांनी कॉंग्रेसकडून अर्ज दाखल करण्यासाठी केलेली तयारी वाया गेली. केव्हा पक्ष बदलला हे माहित झाल्याने अर्ज दाखल करताना घाई गडबडीत काहींच्या हातात कॉंग्रेसचे दोरे कायम आहेत.
इच्छुकउमेदवारही दचकले
थेटमोतीश्रीवर वैयक्तिक संबंध असलेले मच्छिंद्र पाटील हे कडवे शिवसैनिक होते. परंतु अचानक त्यांनी शिवसेना सोडून भाजपकडून एरंडोलमध्ये उमेदवारी दाखल केली. त्यांना भाजप कार्यकर्त्यांचा गराडा असला तरी रहाणीमान आणि घोषणा देताना जीभ मात्र सेनेकडे वळत होती. पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या आमदार जगदीश वळवींचीही तीच गत होती.