आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशात 108 उमेदवार विधानसभा निवडणुकीतून "आऊट'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव शहर- उमेदवारी आणि पक्ष निश्चित नसल्यामुळे ऐनवेळी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अनेकांच्या अर्जात तांत्रिक चुका राहून गेल्या होत्‍या.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या लक्षात आणून दिल्यामुळे अनेकांनी वेळेवर दुरुस्त्यादेखील करून घेतल्या. परंतु गडबडीमध्ये चुका कायम राहण्याची शक्यता असल्याने कोणाचा अर्ज बाद होणार याबाबत सोमवारी जिल्हाभर चर्चा होती. त्यात प्रचारातील पहिला डावपेच म्हणून अनेकांनी विरोधकांच्या अर्जावर हरकती नोंदवल्या. त्यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याने काय निर्णय लागतो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोमवारी खान्देशातील 20 मतदारसंघांमध्ये तांत्रिक चुका, पक्षाचा एबी फॉर्म जोडणे, डमी उमेदवार अशा 108 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. यात जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघांतील 58, धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील 34 नंदुरबार जिल्ह्यातील चार मतदारसंघांतील 16 अर्जांचा समावेश होता.
जळगाव शहर मतदारसंघात पाच उमेदवारांचे अर्ज बाद
जळगाव जळगावशहर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननीमध्ये एकूण जणांचे अर्ज अवैध ठरले. एकूण ३४ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी जणांचे अर्ज बाद झाले आहेत. रमेश जैन यांनी हरकत घेतल्याने ललित कोल्‍हे, सुरेश भोळे सीमा भोळे यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आला असून संबंधितांना बुधवारी सकाळी 11 वाजता म्हणणे सादर करण्याची वेळ दिली आहे. राजेश जैन, शैलेंद्र पाटील, वासुदेव महाजन, उल्हास साबळे, कालू कोळी यांचे अर्ज बाद ठरले आहोत.
जळगावग्रामीणमध्ये 19 जण निवडणूक आखाड्यात
धरणगाव जळगावग्रामीण विधानसभा मतदार संघातील 24 पैकी जणांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. मतदार संघात आलेल्या अर्जांची आज छाननी करण्यात आली. यात दिलीप उत्तम सोनवणे यांचे वय कमी असल्याने, संजय पन्नालाल बाविस्कर यांचे जळगाव शहर यादीत नाव होते परंतु यादी दिली नाही म्हणून अर्ज अवैध ठरवण्यात आला. तर संतश्री बाबा महाहंसजी महाराज यांना एकच सूचक होता, येथे 10 सूचक हवे म्हणून अर्ज अवैध, कैलास वावधन सोनवणे यांचा एक सूचक मतदार संघातील नसल्याने आणि शेख शकील शेख जमील यांचे शहराच्या यादीत नाव असून यादी दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.
अमळनेरयेथे दोघांविरोधातील तक्रारी फेटाळल्या
अमळनेर विधानसभानिवडणुकीसाठी छाननीत 19 उमेदवारांपैकी जयश्री अनिल पाटील, संदीप बबनराव सैंदाणे, संजय पुनाजी पाटील, अनिकेत विजय पाटील उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर जयश्री पाटील, संजय पाटील, अनिकेत पाटील यांच्याकडे पक्षाचे अधिकृत ए.बी.फॉर्म नसल्याने त्यांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यात संजय पाटील अनिकेत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे दोन अर्ज बाद झाले. संदीप बबनराव सैंदाणे यांच्या अधिकृत पक्षाच्या अर्जावर सूचक म्हणून एकच नाव होते, ते 10 असतात त्यामुळे त्यांचा जयश्री पाटील या दोघांचे अर्ज बाद झाल्याने आता रिंगणात 17 उमेदवार आहेत. अनिल अंबर पाटील यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्रात संपत्तीची खोटी माहिती सादर केल्याची तक्रार महेंद्र बोरसे यांनी केली होती. तसेच शिरीष हिरालाल चौधरी यांनी जमीन हडपल्याची तक्रार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळू पाटील यांनी देऊन त्यांचे अर्ज अपात्र करावेत, अशी लेखी तक्रार केली होती. या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी फेटाळल्या. या छाननीत निवडणूक निरीक्षक राम विशाल मिश्रा, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशा गांगुर्डे, नायब तहसीलदार रुपाली काळे हे हजर होते.
चोपडामतदारसंघात दिलरुबाब तडवींचा अर्ज बाद
चोपडा विधासभेसाठी 17 उमेदवारापैकी आदिवासी सेल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलरूबाब तडवी यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. तडवी यांनी अर्जावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस असे म्हटले होते. परंतु त्यास पक्षाचा एबी फॅर्म जोडला नाही किंवा उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून एकही सही नसल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला.