आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी माणसाचे हात रिकामे करण्याचे षडयंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- आमदार राजीव देशमुख यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव बाजार समितीच्या आवारात बुधवारी दुपारी वाजता जाहीर सभा झाली. या वेळी तालुक्यात पाच वर्षांत झालेल्या कामांचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. आपण विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून गेल्या निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यातील सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. बेलगंगा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार असल्याचे आमदार देशमुख यांनी आपल्‍या भाषणात सांगितले.
प्रचारसभेत व्यासपीठावर खासदार ईश्वरलाल जैन, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार दिलीप वाघ, आमदार साहेबराव पाटील, आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँक संचालक प्रदीप देशमुख, तिलोत्तमा पाटील, सभापती अॅड.आर.एल.पाटील, विजय जाधव, तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंखे, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार ईश्वरलाल जैन, अरुण गुजराथी, साहेबराव पाटील, प्रमोद पाटील यांनीदेखील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. लोकसभेत भाजपच्या विचाराचा नव्हे खोट्या प्रचाराच्या व्यवस्थापनाचा विजय झाल्याचे गुजराथी यांनी सांगितले. रामचंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर दिनेश पाटील यांनी आभार मानले.

राज्य सरकारचेवार्षिक बजेट ७० हजार कोटींपेक्षा कमी आहे. विरोधकांकडून मात्र सिंचनात ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतो. पाच वर्षांत ११ दशलक्ष हेक्टर जमिन सिंचन प्रकल्पांमुळे ओलीताखाली आली आहे. प्रकल्पांना वेेळेत निधी मिळाल्याने किंमत वाढली हे मान्य करावे लागेल. गुजरातमधील सरदार सरोवर धरणाला मंजूरी मिळाली त्यापेक्षा ३० हजार कोटींचा खर्च वाढला, मग यास देखील भ्रष्टाचार म्हणायचे काय ? असा प्रश्नही पवारांनी केला.
मराठा, मुस्लिमअशा अनेक समाजाला आरक्षण देऊन आघाडी सरकारने सर्व समाजाचा समतोल विकास साधला अाहे. सिंचन घोटाळा झाला असल्याचा आरोप धादांत खोटा आहे. आपण कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजना राबवल्या आहेत. मुंबईवरील अतिरेकीहल्ल्यानंतर सागरी पोलिस प्रशिक्षण केंद्र मुंबईत उभारण्याचा निर्णय यूपीए सरकारने घेतला होता. परंतु मोदी सरकारने हा निर्णय फिरवत प्रशिक्षण केंद्र गुजरातला उभारण्याचा घाट घातला. याशिवाय हिरे बनवणारे मुंबईतील कारखाने सूरतला हलवण्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हिरे व्यावसायिकांना गळ घातली. गुजरातचा विकास होत असल्यास आम्हास हरकत नाही, पण त्यामुळे महाराष्ट्रातील हात रिकामे होत असल्यास ही बाब आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
४७वर्षांपासूनगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे राजकारण केले आहे, आता सत्तेची भूक भागली आहे. महाराष्ट्राचे गतवैभव कायम राहण्यासाठी आता लढाई सुरू आहे. हिमतीने निर्णय घेणारे नेतृत्व हवे आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.चाळीसगाव येथील जाहीर सभेत बोलताना शरद पवार. व्यासपीठावर खासदार ईश्वरलाल जैन, आमदार साहेबराव पाटील, आमदार राजीव देशमुख, अरुण गुजराथी, प्रदीप देशमुख, शशिकांत साळुंखे, योगेश देसले, आर.एल.पाटील.

काय म्हणाले पवार?
राज्यातील उद्योग गुजरातला हलवून मराठी माणसाचे हात रिकामे करण्याचे षड् यंत्र मोदी सरकारने सुरू केले आहे. यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील हिरे व्यावसायिकांना गळ घातली असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चाळीसगाव येथील प्रचारसभेत केला. यामुळे मुंबईतील एक लाख मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहणार असून केंद्र सरकारचे शेतीमालाचे निर्यात धोरणही हिताचे नसल्याची टिका त्यांनी केली.
मंगळसूत्र बदलणा-यांना धडा शिकवा
भुसावळपावणेपाचवर्ष एका पक्षाचे मंगळसूत्र घालायचे आिण निवडणुकीवेळी पक्षांतर करायचे, हे फारसे याेग्य वाटत नाही. असे कोणी केले असेल तर मतदारांनी त्यांना धडा शिकवण्याची ही योग्य वेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपत गेलेले माजी पालकमंत्री संजय सावकारेंचा नामोल्लेख टाळून त्यांनी शरसंधान साधले. भुसावळच्या बाजार वॉर्डात बुधवारी राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. राजेश झाल्टे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. या वेळी खासदार ईश्वरलाल जैन, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार संतोष चौधरी उपस्थित होते.
महिलांची उपस्थिती लक्षणीय
सभेतमहिलांची उपस्थिती लक्षणीय होती. बचत गट आिण नारीशक्ती अभियानाच्या महिलांनी प्रतिसाद दिला. मंडपातील तब्बल ६० टक्के जागा महिलांनी व्यापली होती. माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी यांनी आपल्या भाषणातही शरद पवारांमुळे स्त्रीशक्तीला सन्मान मिळाल्याचे सांगितल्यावर महिला भारावल्या.