आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशात २२२ उमेदवार निवडणूक आखाड्यात, जळगाव जिल्ह्यात ८० जणांची माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीचे खरे चित्र बुधवारच्या माघारीनंतर स्पष्ट झाले. खान्देशात अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या शब्दाखातर माघार घेतली आहे. त्यामुळे बंडखोरी कुठेही झाली नाही. जळगाव, धुळे, नंदुरबार येथील १२० उमेदवारांनी माघार घेतली आहे.
यात जळगाव ८०, धुळे २४, नंदुरबार १६ माघार घेणाऱ्यांचा समावेश होता. खान्देशातील २० मतदारसंघांत २२२ उमेदवार रिंगणात आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत १२९, धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत ५३, नंदुरबार िजल्ह्यातील चार मतदारसंघांत ४० उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी
जळगाव जळगाविजल्ह्यात अखेरच्या दिवसापर्यंत ८० उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १२९ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघातबुधवारी ११ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता १७ उमेदवार रिंगनात आहेत. बुधवारी माघार घेतलेल्यांमध्ये ललित गौरीशंकर शर्मा, शेख शकिर, मंगला भारत पाटील, ओकांर सोनवणे, अनिल पितांबर वाघ, विनोद पंजाबराव देशमुख, खाटीक मा. हरूण अ. कादीर, डॉ. मुबिन अहेमद खलील अहमद , ईश्वर दयाराम मोरे, सिंधू विजय काेल्हे, रुक्साना बी. बबलूखान (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे.
जळगावग्रामीणमधून उमेदवार बाहेर
धरणगावजळगाव ग्रामीण मतदार संघातील १९ पैकी उमेदवारांनी बुधवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक आता १० उमेदवार िरंगणात अाहे. बुधवारी संजय मुरलीधर पवार, विशाल गुलाबराव देवकर, प्रभाकर गोटू सोनवणे, लक्ष्मण गंगाराम पाटील, उत्तम पंडित सपकाळे, प्रभाकर गोबाजी पवार, शेख शकिल शेख बशिर, इकबाल रहेमान देशमुख आणि जावेद नबाब पटेल यांनी माघार घेतली. संजय मुरलीधर पवार यांनी देवकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यास उमेदवारी मागे घेऊ, असा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला.
भुसावळमतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात
भुसावळमतदारसंघातून २० उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ११ उमेदवार िरंगणात अाहेत. ३५ उमेदवारांनी ६६ उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यात चार उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले हाेते. तर ३१ उमेदवारांचे ४९ अर्ज शिल्लक राहिले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर २० उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यात रवींद्र सपकाळे, राहुल तायडे यांच्यासह बाकी उमेदवारांचा समावेश आहे.
मुक्ताईनगरातबुधवारी उमेदवारांची माघार
मुक्ताईनगरमुक्ताईनगरमध्ये माघारीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सात, तर मंगळवारी एका उमेदवाराने माघार घेतली होती. रवींद्र हरिभाऊ जवरे, अॅड.अर्जुन तुळशीराम पाटील, विश्वनाथ रामचंद्र मानकर, अॅड.तहेसीन खान यासिनखान, िवलास घन:श्याम महाजन, डी.डी.वाणी, संदीप सदािशव सावळे, दगडूशाह करीमशाह अशी माघार घेतलेल्यांची नावे आहेत.
रावेरातबहुरंगी लढत; सहा जणांची माघार
रावेरमतदारसंघातील २१पैकी सहा उमेदवारांनी बुधवारी माघार घेतल्याने बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. िशवाय १५पेक्षा जास्त उमेदवार राहिल्यास दोन मतदान यंत्र लावण्याच्या जाचातून प्रशासनाची सुटका झाली आहे. रावेर िवधानसभेसाठी एकूण २६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी सहा जण निवडणूक रिंगणातून स्वत:हून बाहेर पडले. यात अशोक बाबुराव तडवी (सावदा), नीलेश गणपत अस्वार (खिर्डी बुद्रूक, ता.रावेर), गय्यासुद्दिन सद्रोद्दिन काझी (रावेर), डॉ. प्रतिभा ठाकरे (रावेर), सुरेश गुलाब बोदडे (खिर्डी बुद्रूक, ता.रावेर), सुरय्याबानो दगडू शाह (सावदा) अशी माघार घेणा-यांचे