आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections,latest News In Divya Marathi,

निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार फे-या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठीसर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचार फे-या काढल्या जात असून दिवसभरात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज चौधरी यांची सिंधी कॉलनी, जोशीवाडा, कासमवाडी, मासुमवाडी, गणेशवाडी, पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात सोमवारी प्रचार फेरी निघाली.

काँग्रेसचे उमेदवार डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पंचमुखी हनुमान मंदिरापासून प्रचार रॅलीस सुरुवात केली. गणेशवाडी, संत गाडगेबाबानगर, रचना कॉलनी, वर्षा कॉलनी, ईश्वर कॉलनी, ढाकेवाडी, कंजरवाडा, सिंधी कॉलनी, आकाशवाणी आदी परिसरातून त्यांची प्रचार रॅली निघाली.
भाजपचेउमेदवारराजू भोळे यांची प्रचार रॅली सोमवारी विवेकानंदनगर, पंचमुखी हनुमाननगर, स्नेहल कॉलनी, श्रद्धा कॉलनी, गजानन कॉलनी, पार्वतीनगर, यशवंतनगर, रामानंदनगर, किसनरावनगर, गुलमोहर सोसायटी, अजिंठा कॉलनी, गायत्रीनगर भागातून काढण्यात आली.मनसेचेउमेदवारललित कोल्‍हे यांची सोमवारी प्रचार फेरी निघाली. ती हरिविठ्ठल नगर, व्यंकटेश कॉलनी, रामनगर, जिजामाता शाळा परिसर, राजीव गांधी नगर, श्रीधर नगर, विवेकानंद नगर, रामानंद नगर, पारखनगर, आदींसह विविध निघाली.
भाजपचेउमेदवारएकनाथ खडसे यांच्या प्रचारासाठी अंतुर्ली रावेर परिसरात खडसे खेवलकर खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आली. अंतुर्ली, पातोंडी, नरवेल, भोकरी, धामंदे, घोडसगाव भागात प्रचार केला.